तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

धारावती तांडा येथील ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
 कारखान्यावरुन ऊसतोडणी करुन परतलेल्या ऊसतोड मजुरांवर कोरोना विषाणुच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली होती.जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या मजुरांना जीवनावश्यक वस्तु देण्याची जि.प.मार्फत तरतुद केली होती यानुसार परळी पासुन जवळच असलेल्या धारावती तांडा येथील मजुरांना या किट चे वाटप करण्यात आले.
  परळी तालुक्यातील धारावती तांडा येथील 130 ऊसतोड मजुरांना  जिवनाश्यक किटचे सरपंच डी.एस.राठोड, ग्रामसेवक अनिल हजारे यांच्या  उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत वाटप करण्यात आले.या किटमध्ये पीठ, तांदूळ, डाळ, तेल, मीठ, साखर,पत्ती,  हळद, तिखट, मसाला आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.सामाजीक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रात सर्वात मोठं ऊसतोड मजुरांचे स्थलांतर अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करत ऊसतोड मजुरांना आपल्या गावी आणले. तसेच त्यांना बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष १ कोटी ४३ लाख रु निधी उपलब्ध करून १० हजार ९८ ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना अन्न-धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या कामातून ना.मुंडे यांनी बीड जिल्हाचे खरेखुरे पालक असल्याचे सिद्ध केले आहे.या जीवनावश्यक वस्तुमुळे धारावती तांडा येथील ऊसतोड मजुरांना संकटकाळात मदत झाली.

No comments:

Post a comment