तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 July 2020

तात्काळ निर्णय न घेतल्यास दूध उत्पादकांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सरकारला इशारा



दूध उत्पादकांना अनुदान द्या अन्यथा एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर भाजपा तीव्र आंदोलन करणार

परतूर

आशिष धुमाळ

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दुधाचे भाव 16 ते 18 रुपये पर्यंत घसरले आहेत महाराष्ट्रातील कोरुना संकटामुळे दुधाचे संकलन होत नाही व त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर देखील मिळत नाही अशा परिस्थितीत उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत त्यांच्या मागणीनुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे अन्यथा सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल असा इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी निवेदनाद्वारे सरकारला दिला आहे

परतूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक यांना यावेळी निवेदन देण्यात आले प्रसंगी तालुका अध्यक्ष रमेश भापकर भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संपत टकले सरपंच विठ्ठल बिडवे सरपंच बाळासाहेब पवार प्रशांत बोनगे यांची प्रमुख उपस्थिती होती

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय केवळ ठराविक दूध संघ पुरतेच मर्यादित असून राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर यामुळे अन्याय होत असल्याची भावना संपूर्ण दूध उत्पादक बांधवांमध्ये आहे असेही लोणीकर यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपये अनुदानासह दूध भुकटी निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे आणि गाईच्या दुधाला 30 रुपये दर देण्यात यावा अशी मागणी देखील लोणीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

दुधाच्या पिशव्या तहसीलदारांना भेट देऊन दूध उत्पादक बांधवांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत आपल्या भावना शासनाकडे कळवल्या आहेत याद्वारे सकारात्मक रित्या काही निष्पन्न झाले तर ठीक नसता एक ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून भाजपा दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे याबाबत सरकार अजिबात गंभीर नसून त्याचे परिणाम सरकारला नक्कीच भोगावे लागतील असा इशारा देखील लोणीकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a comment