तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

"अभिनेत्री माया जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पनवेल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती "


 मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्य समशेर , लावणी सम्राज्ञी , माया जाधव यांची  राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पनवेल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली . पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते , मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार व तंत्रज्ञासाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे . ‌माया जाधव यांच्या कडून जेवढे करायला पाहिजे , आणि जेवढं शक्य असेल ते सर्व प्रयत्न  चित्रपट सृष्टीतील कलाकार व तंत्रज्ञासाठी त्या करणार आहेत .अभिनेत्री माया जाधव ज्येष्ठ कलावंताना मानधन मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या इतर अनेक समस्यां सोडविण्यासाठी  प्रयत्न करणार आहेत .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माया जाधव यांची राष्ट्रवादी पनवेल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर  अनेक मान्यवर , कार्यकर्ते आणि कलाकारांनी माया जाधव यांना अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या . माया जाधव यांनी पनवेल तालुकाअध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपुर्वक आभार मानले .

No comments:

Post a comment