तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

'शूर,वीर, मर्दानी.. बीड जिल्ह्याची वाघीण- पंकजाताई मुंडेहिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान ठसा उमटविणाऱ्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कार्यकुशलतेचा सातत्याने अभ्यास करून त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी मंत्री आणि गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे सर्वसामान्य घटकांच्या हितासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

राजकारणात यश-अपयश या अविभाज्य बाबी आहेत.किंबहुना त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु यशाने हुरळून न जाता आणि आपल्या अपयशाने खचून न जाता सातत्याने जनतेच्या गराड्यात राहून त्यांच्या सुखदुःखात सामील होतो, तोच राजकारणात कधी ना कधी भविष्यात उज्वल यशाच्या शिखरावर राहतो, हा इतिहास आहे...

देशाच्या राजकीय इतिहासात बीड जिल्ह्याचा ठसा उमटविणाऱ्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा वसा आणि वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे यांनी गत काही वर्षांमध्ये आपल्या कार्यकुशल तेची चुणूक दाखवून दिली. स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जीवनात अशा प्रकारचे अंतर्गत आणि बाह्य संकटे आली, तशी पंकजाताई मुंडे यांच्या सुद्धा आली परंतु न डगमगता त्यांनी आपले कर्तव्य केले..

दरम्यानच्या काळात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या... एक महिला नेतृत्व असून सुद्धा आणि अल्पसंख्यांक असून सुद्धा या सर्व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्या लोकप्रिय ठरल्या ! त्यामुळे अनेक वेळा त्यांना अंतर्गत आणि बाह्य पक्षाच्या माध्यमातून कसा विरोध झाला हे सर्व राज्यातील जनता जाणून आहे. तरीही त्यांनी कसलीच आदळआपट न करता शांततेने सर्व परिस्थिती हाताळली.

मंत्रीपद असताना महाराष्ट्रात सर्वाधिक निधी खेचून आणून रस्ते आणि शेतीविषयक विविध जलसिंचन योजना आणून गोरगरीब, दीनदलित, दुबळा, अनाथ ,शेतकरी, शेतमजूर,युवक, कामगार यांच्यासाठी योगदान दिले.

अशा लोकप्रियतेच्या शिखरावर जात असताना विरोध न होईल तर ते राजकारण कसले ? म्हणून त्यांना प्रचंड वेगळ्या समस्यांनाही सामोरे जावे लागले. परंतु बीड जिल्ह्यातील तमाम जनतेने त्यांना सातत्याने समर्थन दिले .
असे म्हटले जाते, 'मनुष्य हा जन्मभर शिकत असतो !' तो कधीच परिपूर्ण नसतो. त्यानुसार एखादे अपयश म्हणजे सर्वस्व नसतं किंवा यश सुद्धा परिपूर्ण नसतं ! आणि म्हणून पंकजाताईं चे अपयश ही सामान्य बाब नसली तरी चिंतन करण्यासाठी पुरेशी आहे.. यानिमित्ताने निव्वळ भविष्यात यश दूर राहणार नाही, यासाठी आपल्या कार्यकर्ते, त्यांची जनतेच्या प्रश्नाप्रति असलेली तळमळ आणि आपण स्वतः जनतेच्या प्रश्नावर सामान्य शेतकरी युवकांचे प्रश्न आपण किती थेट सोडवतो ही बाब सुद्धा लक्षात घेतली पाहिजे, असा जनतेतून आवाज येतोय.

केवळ प्रचंड निधी आणून भागणार नाही,तर  जनसामान्यांचे, छोट्या घटकांचे प्रश्न आपण डायरेक्टली किती सोडवतो हा भागही महत्त्वाचा आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ राव मुंडे याबाबतीत राज्यात नव्हे तर देशात नंबर एक वर असतील. कि जे सामान्यांच्या दुःखाचा, त्यांच्या संकटांचा, त्यावर फुंकर मारण्याचा ते निश्चित प्रयत्न करून प्रचंड लोकप्रिय आणि यशस्वी झाले होते !

आदरणीय पंकजाताई मुंडे ह्या लोकनेते मुंडे साहेबांच्या विचार आणि कार्याचा वसा आणि वारसा घेऊन राज्यातील जनतेच्या हितासाठी सदैव ढाल म्हणून समोर राहतील व  येथील लाखो जनतेचे नेतृत्व करतील, याची खात्री आहे.

परळी  मतदारसंघ असेल किंवा बीड जिल्हा तसेच महाराष्ट्र.. या सर्वच ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे मोठे समर्थक आहेत. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे आणि तमाम कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सर्वसामान्य जनतेची सेवा त्यांच्या माध्यमातून घडो... या वैजनाथ चरणी प्रार्थने सह अभिष्टचिंतन दिनी आज त्यांना खूप खूप शुभेच्छा...!

No comments:

Post a comment