तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

" समाजसेवक अमोल केंद्रे यांचा एक हात मदतीचा "


कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी  सरकारने टाळेबंदी सोबतच संचारबंदी लागू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नसल्याने रोजी- रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशावेळी दिवा येथील गोरगरिबांना अन्नदान करण्याचे महत्वपूर्ण कार्य स्थानिक समाजसेवक अमोल केंद्र यांच्या वतीने मागील तीन महिन्यांपासून नि:स्वार्थपणे व अखंडित सुरु आहे. अशा निस्वार्थी  समाज सेवकाचा वाढदिवसही यंदा  अतिशय साधेपणाने  साजरा करण्यात आला . तोच पैसा त्यांनी सामाजिक कार्यासाठी खर्च केला . अत्यंत सरळमार्गी असलेल्या अमोल केंद्रे यांची  साधी राहणी आहे .  समाज सेवेची उच्च आवड असलेल्या अमोल केंद्रे यांनी दिवा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले आहेत . दिवा वासीयांच्या संकट काळातल्या  अनेक अडचणी आणि इतर समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस झटणारे अमोल केंद्रे यांची ओळख केवळ दिवा शहरापुरती मर्यादित न राहता सर्वत्र दूर पर्यंत पोहचली आहे. यामुळेच  सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांप्रमाणे चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध कलावंतही त्यांना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करण्यात अग्रेसर असतात . तानाजी चित्रपटातील तानाजींच्या वडिलांची भूमिका तसेच डाॅ. बी. आर. आंबेडकर मालिकेतील डाॅ. बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका प्रभावीपणे साकारणारे प्रतिभावंत  बाॅलिवूड अभिनेता जगन्नाथ निवंगुने, एक होती राजकन्या व लागिर झालं जी फेम अभिनेता विनोद नरळे, स्वराज्य रक्षक संभाजी व मोलकरीण फेम अभिनेता रवि साळुंखे, माझ्या नवऱ्याची बायको, विठू माऊली फेम अभिनेत्री पूनम शेळके तसेच अभिनेते आदित्य गावडे, विक्की आपटे इ. मान्यवरांनी व्हिडिओ माध्यमाद्वारे समाजसेवक अमोल केंद्र यांना सहकार्य केले आहे .
समाजसेवक अमोल केंद्रे अखंडितपणे चालवित असलेल्या अन्नछत्र माध्यमातून गोरगरिबांना रोज लाभ होतो. त्यांनी हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत तसेच वेळोवेळी राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यात त्यांच्या अर्धांगिनी सौ. अश्विनी अमोल केंद्रे यांचा देखील खारीचा वाटा आहे .२८ मार्च पासून दिवा शहरातील नागरिकांना मोफत जेवण देण्यासाठी  व्हिजन रिस्क्यू एन जी ओ, दोस्ताना जनसेवा फाऊंडेशन,आई फाऊंडेशन, सियाराम मिश्रा युवा फाऊंडेशन, बालदा ग्रुप, समाज विकास फाऊंडेशन, ग्लोबल इंडिया फाऊंडेशन, विद्या ताई जैस्वाल त्याचप्रमाणे इतर सहकारी मित्र प्रवीण निकम, योगेश बनसोडे, आकेश पाटील, विशाल भोसले, पियुष धावडे, बंटी शिंदे, विकास इंगळे, जीलाजित तिवारी, राजेश सिंह, विपीन राय, अनिकेत वीरकर, राहुल जगताप, राहुल शाहू, सचिन सुपेकर, विजय बोऱ्हाडे, प्रवीण उपाध्याय, दिग्विजय मिश्रा, महेश शिकारे, दर्शन खेडेकर, प्रथमेश पेडणेकर, आयुष टेबरें, रितिका कनोजिया, ओंकार दळवी, विवेक विश्वकर्मा, गौरव भगत, एकनाथ वायकर   रवींद्र जाधव यांचे सहकार्य लाभले आहे .

No comments:

Post a comment