तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

हॉटेल-पानशॉप सुरु कऱण्याची परवानगी देण्याची कॉग्रेसची मागणी जिल्हाध्यक्ष: नदीम ईनामदार यानी दिले निवेदन

परभणी : प्रतिनिधी 
देशात व राज्यात कोरोनाचा कहर सुरु असून यामुळे प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन लावण्यात आले होते त्यात पान शॉप,चहा हॉटेल आदी सर्वच बंद करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायीकावर ़उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे नियम अटी लावून त्यांना हॉटेल उघडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी जिल्हाधिकाºयाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
लॉकडाऊन लागल्यापासून ते ़आग तागायत पान शॉप हॉटेल व्यावसायीकींना वगळून उर्वरीत व्यापाºयांना परवानगी देण्यात आली. पान शॉप , चहाची दुकाने गरीबांचीच ़असतात व तेथे काम करणारेही गरीबच आहेत.त्यामुळे या ठिकाणी काम करणाºयांचे अंदाज हजार कुंटुब यावर जगतात त्यांच्यावर मात्र आजघडीला उपासमारीची वेळ आली आहे. मागील ५ महिन्यापासून हाताला काम नसल्यामुळे जीवन जगणे जिकरीचे झाले आहे. परिवाराचा ़उदरनिवार्ह कसा करावा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उदभवत आहे. गरीबांच्या घरात जास्त अन्न धान्य नसते रोज कमवायचे व रोजच खायचे अशी परिस्थिती अनेकांची आहे त्यामुळे जीवन जगायचे कसे.
इतर व्यवसाय ज्या प्रमाणे नियम व अटीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी दिली त्याच प्रमाणे यांना परवानगी देण्याची मागणी कॉग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी केली.

No comments:

Post a comment