तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 30 July 2020

सेलू तालुका क्रीडा संकुलास वाढीव निधीही देऊ : आमदार मेघना साकोरे (बोर्डीकर)पाच कोटी रुपयांच्या  बांधकामास शासनाची मंजुरी                                                      

सेलू, दि.३० ( प्रतिनिधी ) : सेलू ( जि.परभणी ) येथील तालुका क्रीडा संकुल समितीची २८ जुलै रोजी न.प.सेलू येथे तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्षा आमदार मेघना साकोरे (बोर्डीकर) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नगर परीषद सेलू वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अशोक कासार यांनी केले.                 यावेळी आमदार बोर्डीकर म्हणाल्या, सेलू तालुका  सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून आता क्रीडा क्षेत्रात पुढे जाणार आहे.या करीता क्रीडा संकुलातील सुविधा निर्माण करून देऊ, यास लागणारा  वाढीव निधी शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिला जाईल, आता लवकरच सेलू तालुक्यातील खेळाडूंना सुसज्ज क्रीडा संकुल खेळण्यासाठी मिळणार, या सोबतच जलतरणपटूस जलतरणीका उभारण्यात यावी असे सांगितले.                                       सेलू तालुका क्रीडा समितीचे कार्याध्यक्ष तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी  बैठकीत राज्य क्रीडा विकास समितीच्या वतीने एक कोटी चा निधी मंजुरी झाला आहे ,यात लोकप्रिय खेळ कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल, या साठी २२ लक्ष निधी तर विविध खेळाच्या सरावासाठी इनडोअर हॉल चा डोंम तयार कराण्यासाठी ५८ लक्ष , व तालुका क्रीडा संकुलास संरक्षण भिती साठी २०.५०  लक्ष अंदाजे उपलब्ध झाला आहे. वरील काम हाती घेण्यासाठी सर्वानुमते ठराव घेण्यात आला.                     तालुका क्रीडा समितीचे सचिव ,तालुका क्रीडाधिकारी शैलेंद्रसिंग गौतम यांनी बैठकीचे प्रस्ताविकात महाराष्ट्र शासनाच्या वतीने  सेलू तालुका क्रीडा संकुलास पाच कोटी निधीचे अंदाजपत्रक व बाधंकामास महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली असुन उपलब्ध निधीच्या अनुषंगाने एक कोटी रूपयांची कामे सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे.                                    

उर्वरित चार कोटीचा निधी उपलब्ध  झाल्यावर , मैदानी क्रीडा स्पर्धा साठी २०० मी धावनपथ, अत्याधुनिक सुविधात बँडमिटंन, टेबल टेनिस , योगा बहुउद्देशिय हॉल , तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाची इमारत,  मैदानावर सौरऊर्जा  व सोलार सिस्टीम, अद्ययावत क्रीडा साहित्य याबाबींवर खर्च होतील.                   
सेलू नगर परिषदेची सर्वे नंबर २५६/२५७ मधील दोन एकर तेरा गुंठे जागेवर सेलू तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.                                      याप्रसंगी नगराध्यक्ष विनोद बोराडे म्हणाले सेलू शहरात सांस्कृतिक ,शैक्षणिक विकास सोबत क्रीडा क्षेत्रात विकास व्हावा उद्देशाने नगर परिषद सेलू वतीने जागा उपलब्ध करून दिली आहे. शासनाच्या निधीतून क्रीडा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.            

बैठकीत कार्यकारी सदस्य मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, बांधकाम विभागाचे अभियंता विनोद देशमुख व दिपक कुपटेकर, उपमुख्याधिकारी अक्षय पल्लेवाड, सेलू तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे आदी उपस्थित होते.

पूर्ण...

No comments:

Post a comment