तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

जनतेच्या आरोग्याची काळजी न.प. प्रशासनाने त्वरित घ्यावी―प्रा.टी. पी. मुंडेपरळी नगरपालिकेचे
 मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी ; गांभीर्याने दखल घेण्याची केली सूचना

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि 29 जुलै 2020
परळी शहर व परळी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परळी शहरातील विविध विभागांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्ण सापडत असून त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे गेल्या 19 जुलै रोजी डिजिटल पद्धतीने निवेदन परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेले होते परंतु निवेदनाची कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही परळी शहरातील  सामान्य जनतेची  आरोग्याची काळजी  गांभीर्याने  घ्यावी  तसेच  मुख्याधिकारी यांनी  गांभीर्यपूर्वक दखल देणे गरजेचे आहे . परळी नगरपालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी परळी शहरातील प्रत्येक विभागात व वार्डात सॅनिटाझरने फवारणी करावी तसेच निर्जंतुकीकरण प्रतिबंधात्मक फवारणीही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी केली आहे.


     परळी शहरातील सामान्य जनतेची आरोग्याची काळजी घेणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे मात्र या गोरगरीब सामान्य जनतेची आरोग्याची काळजी नगरपालिका प्रशासनाने अद्यापही घेतली नाही त्यामुळे सामान्य व गोरगरीब जनतेच्या आरोग्याची नगरपालिकेने खेळू नये तसेच स्वच्छतेवर विशेष भर देऊन लोकांचे आरोग्य कसे चांगले ठेवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने येणारा निधी हा आरोग्यावर खर्च करावा मात्र असे होताना दिसत नाही.


    गेल्या 25 दिवसांपासून राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील एसबीआय बँकेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची  लागण झाली व त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असे असताना नगरपालिकेने स्वच्छतेवर भर दिला पाहिजे. यापूर्वी दि 19/07/2020 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी कळविण्यात आले होते  व मागणी केली होती परंतु  मुख्याधिकारी व नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले म्हणून सामान्य जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. परळी शहरात येत्या आठ दिवसात वार्डात व विभागात   सॅनिटायझरने त्वरित फवारणी करावी तसेच सर्व विभागात  निर्जंतुकीकरण  प्रतिबंधात्मक फवारणीही करावी अशी मागणी लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी केली आहे.


    या संगणीकृत निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी बीड ,मा.अधीक्षक साहेब बीड ,मा .उपजिल्हाधिकारी साहेब,मा. शल्यचिकित्सक साहेब बीड, मा.तहसीलदार साहेब परळी ,यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a comment