तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 31 August 2020

वैद्यकीय प्रवेशाबाबत M B B S सद्याचे 70:30 विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020/2021पासून रद्द करा राजीव सातवहिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

वैद्यकीय प्रवेशा बाबत MBBS सध्याचे 70:30 प्रमाने विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020/2021 पासून रद्द करण्यात यावे अशी मागणी राजीव सातव संसद सदस्य राज्यसभा यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री श्री अमित जि देशमुख यांच्या कडे एका पत्राद्वारे मागणी केली आहें
महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय प्रवेश 70/30चे विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020/2021रद्द करण्यात यावे अशी मागणी विध्यार्थी करीत आहेत मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशासाठी जागा कमी असल्याने अनेक गुणधारक  विध्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहत आहेत देश पातळी वर निट हि एकच परीक्षा घेतली जाते व देशातील ईतर कुठल्याही राज्यात 70/30/ धोरण राबवल्या जात नाही तरी मराठवाड्यातील विध्यार्थीवर होणार अन्याय दूर करण्या करीत मा .श्री अमितजि देशमुख वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई सदर आपन यावैद्यकीय  विषया मधे लक्ष घालून वैद्यकीय प्रवेशासाबाबत MBBS सध्याचे 70/30 प्रमाने विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020/2021पासून रद्द करण्यात यावे अशी मागणी राजीव सातव यांनी दि 30 /08/2020 रोजी एका पत्राद्वारे मा .श्री अमितजि देशमुख यांना केली आहें 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो .8007689280

परळी शहरातील प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती संकलन केंद्र जाहिर सर्व नागरीकांनी श्रीगणेश मुर्ती नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय संकलन केंद्रात देण्याचे आवाहन-स्वच्छता सभापतीकिशोर पारधे

परळी वैजनाथ | प्रतिनिधी |

         प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक 01.सप्टेंबर 2020 रोजी अनंत चुर्तदशी निमित्त श्री वैद्यनाथ मंदिरच्या बाजुस असलेल्या हरिहर तिर्थामध्ये श्रीगणेश विसर्जन करण्यात येणार आहे. माननिय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता गणेशोत्सव - 2020 च्या मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या असुन या वर्षीचा गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे बाबत आदेशीत करण्यात आले आहे. तसेच श्रींच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येवु नयेत असे निर्देश प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालकमंञी  मा. ना.धनंजयजी मुंडे,व न.पचे गटनेते वाल्मीक (आण्णा) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या नियोजनात न.प.अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व स. सभापती, सर्व स. सदस्य / सदस्या यांच्या सहकार्याने स्वच्छता, आरोग्य व वैद्यक सभापती  किशोर पारधे यांनी परळी शहरामध्ये गणेश मंडळामार्फत स्थापन करण्यात आलेली श्रीगणेश मुर्ती तसेच नागरीकांनी त्यांच्या घरी स्थापन केलेल्या श्रीगणेश मुर्ती संकलीत करण्याकरीता खालील प्रमाणे प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती संकलीत करण्यासाठी स्थळ (केंद्र) निश्चित केलेले आहेत, तरी परळी शहरातील सर्व नागरीकांनी आप-आपल्या प्रभागात निश्चित केलेल्या श्रीगणेश मुतो संकलन केंद्रावरच श्रीगणेश मुर्ती नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे द्यावी जेणे करुन श्रीगणेश मुर्तीचे विधिवत विसर्जन करणे शक्य होईल. अधिक माहितीसाठी 1) दिलीप म. रोडे, सहाय्यक कार्यालय अधिक्षक, न.प. परळी वै. (मो क्र. 9765253425),2)
शंकर साळवे, प्र. स्वच्छता निरीक्षक, न.प. परळी वैजनाथ (मो.क्र. 9881839783 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन स्वच्छता, आरोग्य व वैद्यक सभापती किशोर पारधे यांनी केले आहे.

*-सविस्तर विभागवार संकलन केंद्राची माहिती-*
अनु.क्र.1) मिलिंद नगर,थर्मल कॉलनी,थर्मल कॉलनी क्लब बिल्डिंग दक्षिण बाजु, सुपर  ईएफडी थर्मल कॉलनी, खतीब बेकरी, मिलिंद नगर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र थर्मल कॉलनी मुख्य गेट वर असणार आहे.
अनु.क्र.2) बरकत नगर शिवाजी नगर परिसर,सुर्वेश्वरनगर,बरकत नगर, शिव नगर,भिमानगर,सिद्धेश्वर नगर, सटवाई मळा या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र संत नरहरी महाराज मंदिर रोड, विद्युत डी.पी जवळ असणार आहे.
अनु.क्र.3) उखळवेस परिसर, वैद्यनाथ  विद्यालय प्राथमिक शाळा, दक्षिण बाजूस,साठे नगर, ताटे गल्ली,रोडे गल्ली, रमा नगर,भीम नगर परिसर, अनंतपुरे गल्ली,उखळवेस गल्ली, देशपांडे गल्ली, बांगर गल्ली,गणेशपार, धनगर गल्ली, होळकर गल्ली चौक उत्तर बाजु या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र  सावता माळी मंदिर कमान श्री दीपक नाना देशमुख यांच्या घराजवळ वर असणार आहे.
अनु.क्र.4) गणेशपार,काळ रात्री मंदिर परिसर, देशमुख गल्ली,गणेशपार, जंगली गल्ली, गोराराम मंदिर,जगतकर गल्ली, बुद्ध विहार समोरचा भाग, बंगला गल्ली, सरकारवाडा वैद्यनाथ विद्यालय शाळा गल्ली ते गणेशपार रोड वैद्यनाथ विद्यालय झुरुळे गोपीनाथ गल्ली या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र गणेश मंदिर जवळ गणेशपार येथे असणार आहे.
अनु.क्र.5) सावता माळी मंदिर परिसर, संत नरहरी महाराज मंदिर परिसर,गंगासागर नगर,किर्ती नगर ,सिद्धेश्वर नगर ,कृष्णा नगर, सावतामाळी मंदिर परिसर जि प कन्या शाळा परिसर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र सावता माळी मंदिर जवळ असणार आहे.
अनु.क्र.6) पद्मावती गल्ली,इंदिरानगर परिसर, जाजूवाडी, इंदिरानगर, रहमत नगर, पद्मावती गल्ली, खाडीनाला परिसर,आनंदनगर पूर्व, पद्मावती गल्ली या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र हनुमान मंदिर जवळ पद्मावती गल्ली येथे असणार आहे.
अनु.क्र.7) भिमवाडी परिसर,जुने रेल्वे स्टेशन, भिमवाडी,कुरेशी नगर,काकर मोहल्ला,अंबाजोगाई वाडा,सुभाष चौक या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र सुभाष चौक येथे असणार आहे.
अनु.क्र.8) सिद्धार्थ नगर,गौतम नगर परिसर,आझाद नगर,सिद्धार्थ नगर,गौतम नगर, फुलेनगर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र एस.के.हाॕटेल येथे असणार आहे.
अनु.क्र.9) शिवाजीनगर थर्मल परिसर,शिवाजी नगर,आंबेडकर नगर, अशोक नगर, गँगमन कॉटर, रेल्वे पोलीस स्टेशन,शिवाजी नगर (सोनपेठ नाका)रेल्वे दवाखाना, इराणी वस्ती,आश्रम शाळा परिसर,नागसेन नगर,रेस्ट हाऊसच्या पाठीमागील परिसर,वाल्मिकी नगर,एक मिनार मज्जित पाठीमागील परिसर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र ओव्हर ब्रिज जवळ बेग टाइल्स येथे असणार आहे.
अनु.क्र.10) डॉ बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर परिसर, जलालपूर,सोमेश्वर नगर ,शारदानगर ,माधवबाग, कंडक्टर कॉलनी, इरिकेशन कॉलनी, पंचशील नगर,बॕक कॉलनी,डॉ बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर पाठीमागील परिसर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र शिवाजी चौक येथे असणार आहे.
अनु.क्र.11) विद्या नगर,एरिकेशन कॉलनी परिसर, विद्यानगर,गजानन महाराज मंदिर परिसर,जिरगे नगर,प्रिया नगर, माणिक नगर परिसर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र गजानन महाराज मंदिर जवळ असणार आहे.
अनु.क्र.12) कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर,पोस्ट ऑफिसच्या दक्षिण बाजू,मोंढा मार्केट टेलर लाईन मोंढा अडत लाईन भाजी मार्केट,विवेकानंद नगर, हिंद नगर,गुरुकृपा नगर हालगे गल्ली,स्वाती नगर, ओपळे गल्ली, गांधी मार्केट हमालवाडी या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती हनुमान मंदिर जवळ मोंढा मार्केट येथे असणार आहे.
अनु.क्र.13) औद्योगिक वसाहत परिसर,पंचवटी नगर,हाउसिंग सोसायटी,घरणीकर रोड, हाउसिंग सोसायटी,औद्योगिक परिसर,बाजीप्रभू नगर माणिक नगर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र जगमित्र नागा मंदिर जवळ असणार आहे.
अनु.क्र.14) पेठ मोहल्ला,सुरेश्वर मंदिर परिसर,सुरेश्वर मंदिर परिसर,पेठ मोहल्ला, जुने बालाजी मंदिर परिसर,देशमुख वाडा,भुई गल्ली, राजपूत गल्‍ली, पेठ गल्ली, देशमुख पार, वाकडे गल्ली या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र देशमुखपार येथे असणार आहे.
अनु.क्र.15) अंबवेस/ नांदूरवेस परिसर,प्रबुद्ध नगर,काल रात्री मंदिर पाठीमागील परिसर, जवचुकार गल्ली, नांदूरवेस, जमालपुरा, बंगला गल्ली,राजगल्ली, गणेशपार रोड ते नांदूर वेस पश्चिम बाजू,मुजावरवाडा,हनुमान नगर, आयेशा कॉलनी,राहूल नगर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र  हनुमान नगर चौक चांदापूर रोड येथे असणार आहे.
अनु.क्र.16) वैद्यनाथ  मंदिर,मलीपुरा, माणिक नगर परिसर ,वडारवाडा कॉलनी, जि प शाळा वैद्यनाथ  विद्यालय समोरील भाग,हबीबपूरा,पावर हाउस,मलिकपुरा, पोलीस कॉलनी, माणिकनगर, गवते किराणा,मारुती मंदिर जवळ,माणिक नगर इंडस्ट्रीज एरिया या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र  पंचायत समिती जवळ असणार आहे.

टिपू सुलतान सेवाभावी संस्थेच्या वतीने मोईन खान यांचा सत्कार

परभणी : प्रतिनिधी 
जिल्हयातील  पत्रकीराता क्षेत्रात अग्रेसर असणाºया मोईन खान यांची आॅल इंडिया उलमा बोर्डच्या मिडीया सेल मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल टिपू सुल्तान सेवभावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.        
 यावेळी शहीद टीपू सुल्तान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शेख इस्माइल, तालुका अध्यक्ष आसिफ शेख सामाजिक कार्यकर्ता आवेस बाबा, साहिल भाई जाबिर भाई गुत्तेदार आदी उपस्थित होते.

कोरोना काळात ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना लागू केलेले ५० लाखाचे विमाकवच शासनास केले परत!


आश्वासन देऊन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री निर्णय देत नसल्याच्या निषेधार्थ निर्णय!

मेल्यावर १० हजार कोटींचे विमा कवच पण जिवंतपणी शासन कर्मचारी दर्जा का देऊ शकत नाही ? ---- सिद्धेश्वर मुंडे

मुंबई(प्रतींनिधी) :-  कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतचे संगणकपरिचालक एक कोव्हिड योद्धा म्हणून ग्रामपंचायत स्तरावर काम करत आहेत,त्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक संगणकपरिचालकाला शासनाने ५० लक्ष रुपयांचे विमा कवच लागू केले.परंतु मागील ९ वर्षापासून प्रलंबित असलेला संगणकपरिचालकांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सध्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांनी आझाद मैदानावर येऊन दिले व कंपनीची मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपलेली असताना कोरोनाचे कारण पुढे करत शासन निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ शासनाने कोरोंना काळात लागू केलेले ५० लक्ष रुपयांचे विमा कवच वापस घेण्याची मागणी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन केली असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. 
      याबाबत सविस्तर वृत्त की,महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून एप्रिल २०११ पासून डिसेंबर २०१५ पर्यंत संग्राम व डिसेंबर २०१६ पासून आजतागायत आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प सुरू आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून मागील ९ वर्षापासून ग्रामीण भागातील सुमारे ६ कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन सेवा देण्याचे काम जे संगणकपरिचालक करत आहेत,त्यांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान वेतन देण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे.मागील काळात सध्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ,सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजयजी मुंडे,नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे,अन्न व नागरी पुरवठामंत्री ना.छगनजी भुजबळ,ना.विजयजी वडेट्टीवार,ना.अमितजी देशमुख ना.बच्चूजी कडू यांच्यासह एक डझन सध्याचे मंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा शासन बैठक घेऊन निर्णय घेत नाही. 
जिवंतपणी शासन प्रश्न सोडवत नाही मग मेल्यावर संगणकपरिचालकाला कोरोना काळात १० हजार कोटींचे विमा देऊन उपयोग काय ?
   “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील संगणकपरिचालक मागील ९ वर्षापासुन डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याची भूमिका बजावत आहेत त्याकामाची दखल घेऊन राज्यातील सर्व  संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेने केली.त्यानुसार ग्रामविकासमंत्री ना.हसनमुश्रीफ व मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे  यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु कोरोंनाचे कारण दाखवत अद्याप निर्णय घेतला नाही.एकीकडे निर्णय घ्यायचा नाही आणि दुसरीकडे कोरोंना काळात काम करणार्या  प्रत्येक संगणकपरिचालकाला ५० लाख रुपयांचे विमा कवच शासनाने लागू केले.२० हजार संगणकपरिचालकांच्या विमा कवचाचा विचार केला तर १० हजार कोटी रुपयेचे कवच होते.त्यामुळे संगणकपरिचालकांना विचार पडला की आज वर्ष वर्ष मानधन मिळत नाही तरीही संगणकपरिचालक काम करत आहेत,अनेक वेळा आंदोलने मोर्चे झाली शासनाने आश्वासन देऊन सुद्धा निर्णय घेण्यास टाळाटाळ करण्यात येते मग जिवंतपणी प्रश्न सोडवून न्याय द्यायचा नाही आणि मेल्यानंतर ५० लाख रुपये द्यायचा याला कोणता न्याय म्हणयचे ?म्हणून शासनाच्या या चुकीच्या धोरणाचा निषेध म्हणून हे कोरोंना काळातील विमा कवच वापस करून आपले कोरोंना काळातील काम विमा कवचा विना सुरूच ठेवण्याचा निर्णय संगणकपरिचालकानी घेतला आहे. 
संग्राम व आपले सरकार प्रकल्पात झालेल्या सुमारे ९०० कोटींच्या घोटाळ्याकडे शासनाचे दुर्लक्ष का ?
       राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद मधील सर्व कामकाजामध्ये सुसूत्रा आणून पारदर्शक कारभार करण्यासाठी संग्राम व आपले सरकार हे प्रकल्प १३ व्या व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून राबवण्यात आले परंतु या प्रकल्पाची अमलबजावनी यंत्रणा असलेली महाऑनलाईन लिमिटेड मुंबई व Csc e_governance Limited नवी दिल्ली या कंपन्यांनी व या कंपन्यांच्या उपकंपन्यांनी ९ वर्षात सुमारे ९०० कोटींचा भ्रष्टाचार केला असून या बाबत अनेक वेळा शासनाकडे तक्रार केलेली असताना या कंपन्याची चौकशी करून शासनाने कारवाई का केली नाही.त्याकडे शासनाने दुर्लक्ष करून कंपन्यांना पाठीशी घातले आहे. 
महाराष्ट्र शासनाचे आय.टी.महामंडळ असताना दिल्लीच्या CSC –SPV कंपनी कडून संगणकपरिचालकांची नियुक्ती कशासाठी ?
      महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागात माहिती व तंत्रज्ञान विभागाचे कामे करण्यासाठी कर्मचार्यांपचा पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाचा १०० % हिस्सा असलेले महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ ९ ऑगस्ट २०१६ रोजी स्थापन झालेले आहे.या महामंडळा अंतर्गत सर्व विभागांना कर्मचार्यांीचा पुरवठा करण्यात आलेला आहे.परंतु ग्रामविकास विभागातील आपले सरकार सेवा केंद्र या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी दिल्लीच्या csc –spv कंपनीची नेमणूक राज्य शासनाने केली व त्या कंपनीकडूनच संगणकपरिचालकाची नियुक्ती केली हे अन्यायकारक आहे.
     यामुळे शासनाकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ कोरोना काळात ग्रामपंचायात संगणकपरिचालकांना शासनाने लागू केलेले  ५० लक्ष रूपयांचे विमा कवच निवेदन देऊन शासनास वापस करण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.

56 वर्षीय जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.शिवाजी पवार यांची कोरोनावर मात करुन कर्तव्यावर रुजु


हिंगोली प्रतिनिधी 

आज दिनांक 31/08/2020 रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख डाँँ.शिवाजी पवार व जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी  यांना दिनांक 12/08/2020 रोजी कोरोना ची बाधा झाली होती त्यानंतर शासकीय रुग्णालयात आयसोलेशन वार्डात त्यांच्या वर उपचार करण्यात आला रूग्णालयातील डाँक्टर व स्टाफ ने उत्कृष्टपणे उपचार केला व जिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट उपचार भेटतो व तेथील स्टाफ डाँक्टर हे खुप मेहनती व काळजी करणारे आहेत असे यावेळी डाँ.पवार यांनी सांगितले तसेच त्यांना दिनांक 22/08/2020 रोजी शासकीय रुग्णालयातुन सुट्टी झाली व ते होम क्वारनटाईन राहिले 7 दिवस त्यानंतर ते आज सकाळी दोघेही कामावर रुजु झाले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी डाँ.पवार व तुपकरी यांचा सत्कार केला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  गणेश वाघ,बोंद्रे,   उप मुख्य कार्यकारी अधिकारी    नितीन दाताळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दामोदर हिवाळे,, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाँ.प्रविण घुले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डाँ.राहुल गिते, जिल्हा हिवताप अधिकारी डाँ.गणेश जोगदंड,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे,जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी,नरोटे,पारडकर,अमोल कुलकर्णी,मुन्नाफ,व सर्व जिल्हा परिषद विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी या दोघांचा सत्कार केला

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

संग्रामपूरात काॅग्रेसच्या वतीने केन्द्र शासनाच्या निर्णयाचा निषेध तर JEE- NEET परिक्षा पुढे ढकलण्याची राष्ट्रपती कडे मांगणीसंग्रामपुर [ प्रतिनिधी] अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी यांनी आदेशान्वये, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात  तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना JEE-NEET परिक्षा पुढे ढकलण्यात यावे या मांगणीचे तालुका काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात नमुद आहे कि संपुर्ण देशात कोरोना विषाणुचे संक्रमण जारी असतांना, विद्यार्थि, शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या जिविताची पर्वा न करता,JEE-NEET परिक्षा घेण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखेडे,तेजराव मारोडे, प्रकाशराव देशमुख, संतोष राजनकार, हरीभाऊ राजनकार, शे अफरोज शे आसिफ, कमरोद्दीन मिर्झा, सतिश टाकळकार, शिवकुमार गिरी, गणेश टापरे, शे युसूफ, अमोल घोडेस्वार, शे सिद्दीक ,गोपाल इंगळे, शे सईद , प्रदीप बोदडे, रवींद्र इंगळे, शे सुलतान , मोहन ठाकरे, दत्ता अवचार,निलेश तेल्हारकर, प्रमोद गढे, प्रकाश साबे,नेमीवंत तेल्हारकर,हरिश केदार, हरिदास दामधर, रमेश इलामे, अनंता हागे सह काँग्रेस  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

जिंतूरात कोव्हिडं संबधी उपाययोजना बंद,


सर्वसामान्य चिंतेत 
तर प्रशासन उदासीन

बधितांचा आकडा दररोज वाढतोय

जिंतूर 
कोरोना संसर्ग वाढत्या क्रमाने असून शहरातील
कोव्हिडं बाधित संख्या आजच्या तारखेला 173 होऊनही तालुका प्रशासन संसर्ग वाढू नये म्हणून जिंतूर शहरातील करण्यात आलेल्या उपाययोजना एक एक करून बंद करीत आहे की काय असे चित्र सद्या दिसत आहे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर होत नाहीत,
बाधित रुग्णाचे ठिकाण प्रतिबंधित  करण्यात येत नाहीत गर्दी नियंत्रित करण्यासाठी न प व पोलीस प्रशासन यांनी खुप मेहनत घेऊन शहरात सर्व नियोजन टॉप टीप लावले होते
शहरात एक जरी रुग्ण आढळला तरी 4 दिवस कडेकोट बंद झाले आणि सर्व  उपाय योजना करण्यात येत होत्या आज तालुका आरोग्य विभागाच्या वतीने मिळालेल्या माहिती वरून रुंगणाची संख्या 173 पर्यंत जाऊन पोहचली तरी प्रशासनाने का मोकळे सोडले हे सामान्य नागरिकांना न उलगडणारे कोडे आहे म्हणून शहरातिल नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे
या परिस्थिती मुळे नागरीक पण कोणतेही नियम पाळायला तयार नाहीत
शहरात गणेशोत्सव असल्याने पोलीस दला कडुन जादा कुमक मागवली पण या बाबत त्यांना काय जबाबदारी दिली होती हे पण सर्व सामान्यांना कळलं नाही एकंदर कोव्हिडं वाढत असताना व संपूर्ण संसर्ग कमी होण्यापूर्वीच प्रशासन का गप्प आहे हे मात्र सामान्य व्यक्तींना कळन अवश्यक वाटते
ता आपत्ती व्यवस्थापन समिती कडून उपाययोजना बंद करण्यात आल्या की अंमलबजावणी होत नाही या बाबत उदासीनता दिसून येते म्हणून संबंधित वरिष्ठांनी दखल घ्यावी असे नागरिकांत उघड पणे बोलले जात आहे

पीककर्जासंदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली बँकांची झाडाझडती... तर पिककर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांमधील सरकारी डिपॉझिट काढून घेऊ - ना. मुंडे

अंबेजोगाई (दि. ३१) ---- : पीककर्ज वाटपा संदर्भातील तक्रारींचा विचार करत आयोजित बँकर्सच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बँकांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी पीक कर्जाचे टार्गेट व वाटप करण्यास टाळाटाळ करत असणाऱ्या बँकांविरुद्ध थेट कारवाई करणार असून नोटीस पिरेड ठरवून त्या आत कर्जाचे प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यास त्या बँकांमधील शासकीय डिपॉझिट काढून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्य शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी व नव्याने कर्ज घेऊ इच्छिणारे शेतकरी या सर्वांनाच पीक कर्ज देणे क्रमप्राप्त असून, याबाबतच्या सर्वात जास्त तक्रारी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांसह काही बँकांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून ही उदासीनता संपवून कर्ज वाटपाचा वेग न वाढविल्यास तातडीने कारवाई करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना ना. मुंडेंनी दिले आहेत. 

या बैठकीस आ. प्रकाशदादा सोळंके, आ. संजय दौंड, जि.प. अध्यक्षा सौ. शिवकन्या शिरसाट, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यासह विविध बँकांचे प्रमुख अधिकारी/प्रतिनिधी उपस्थित होते.

विविध बँकांमध्ये आतापर्यंत दाखल झालेले १३६०० अर्ज प्रलंबित असून, एकट्या डिसीसी बँकेकडे ठरवलेल्या टार्गेट पैकी २८२ कोटी रुपये रक्कम वाटप आणखी बाकी आहे.

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या ७४९३८ शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपये नव्याने कर्जवाटप आतापर्यंत केले असून, ही संख्या वाढवणे बँकांकडून अपेक्षित आहे. कर्जमाफी मिळालेल्या नव्याने कर्ज अपेक्षित असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज देणे अनिवार्य आहे.

मात्र दररोज शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तक्रारी पाहता बँकांच्या मनात पाप आहे की काय, अशी शंका येत असल्याचे ना. मुंडे म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँका जर उदासीनतेमुळे किंवा जाणिवपूर्वक वेठीस धरत असतील तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभे करू. तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांचे बँकांमधील डिपॉझिट काढून घेऊ, अशी तंबी यावेळी बोलताना ना. मुंडे यांनी दिली.

दरम्यान कर्जवाटप केल्याची यादी, आकडेवारी ही समाधानकारक नसून बँकांनी शेतकऱ्यांना वेठीस धरणे बंद न केल्यास आता राज्य सरकार म्हणून आम्हाला त्या त्या बँकांविरुद्ध कारवाई करावी लागेल, तसेच बँकांनी आपली भूमिका न बदलल्यास त्या त्या बँकांमधील सरकारी खाते व डिपॉझिट काढून घेऊ; असे यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी अधोरेखित केले.

नवनियुक्त शिक्षकांना सहाय्यक शिक्षक पदनाम देऊन नियुक्ती आदेश सुधारीत करा.

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी.
मागील काही दिवसातच पवित्र पोर्टल मार्फ़त शिक्षकांची भरती करण्यात आली आहे.परंतु ह्या नवनियुक्त शिक्षकांना जुने शिक्षण सेवक हेच पदनाम देण्यात आले मुळात 14 मे 2012 मध्ये शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार ह्या पदाचे नाव सहाय्यक शिक्षक(परिविक्षाधीन) अस करण्यात आल आहे असं असुन सुद्धा शासन अजुनही नवनियुक्त शिक्षक यांना सेवक म्हणुन हिनवत आहे लवकरच ह्या पदाचे पदनाम सहायक शिक्षक(परिविक्षाधीन) करण्यात याव अश्या प्रकारचे निवेदन परमेश्वर इंगोले राष्ट्रवादी प्रदेश सचिव यांनी आयुक्त विशाल सोळंकी यांना दिले आहे.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

लाँकडाऊनच्या काळात राज्यात कोविड संदर्भात २ लाख ४५ हजार गुन्हे


२३ कोटी ४७ लाख रुपयांची दंड आकारणी
८ लाख १६ हजार पास                                                 -गृहमंत्री अनिल देशमुख

   मुंबई दि ३१ -  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ४५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
    राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे दि.२२ मार्च ते ३० ऑगस्ट पर्यंत  कलम १८८ नुसार 
२,४५,९२९   गुन्हे नोंद झाले असून ३४,१८२ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी 
 २३ कोटी ४७ लाख ०७  हजार ५६४ रु. दंड आकारण्यात आला.
    तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ८ लाख १६  हजार ७९८ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
      कडक कारवाई
 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
 या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३४० घटना घडल्या. त्यात ८९१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
१०० नंबर- १ लाख
११ हजार  फोन
     पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.       लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,११,२९१ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. 
       तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
       या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,१०६ वाहने जप्त करण्यात आली.
पोलिस कोरोना कक्ष
     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ६२ पोलीस व ७ अधिकारी अशा एकूण ६९,
नवी मुंबई २, 
ठाणे शहर १७,
पुणे शहर ३,
नागपूर शहर ५,
नाशिक शहर ३,
अमरावती शहर १ wpc,
औरंगाबाद शहर ३,
सोलापूर शहर ३,
 ठाणे ग्रामीण ४ व १ अधिकारी,
पालघर २ व १ अधिकारी,
रायगड ३,
पुणे ग्रामीण २,
सांगली १,
सातारा ३,
कोल्हापूर १,
सोलापूर ग्रामीण १, 
नाशिक ग्रामीण ५,
जळगाव  २,
अहमदनगर ३,
उस्मानाबाद १,
बीड १,
जालना १,
बुलढाणा १,
चंद्रपूर १,
मुंबई रेल्वे ४,
पुणे रेल्वे अधिकारी१,
औरंगाबाद रेल्वे १,
SRPF Gr 3 जालना-१,
SRPF Gr 9 -१,
SRPF Gr 11 नवी मुंबई १,
SRPF Gr 4 नागपूर -१अधिकारी,
SRPF Gr 4 -१अधिकारी,
ए.टी.एस. १,
PTS मरोळ अधिकारी १,
SID मुंबई २ व १अधिकारी
अशा  १५६ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या ३७६ पोलीस अधिकारी व २४७४ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागरिकाचा सहभाग अपेक्षित
         कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.लाँकडाऊनच्या काळात राज्यात कोविड संदर्भात
२ लाख ४५  हजार गुन्हे

सामना चे हिंगोली प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराने निधन


हिंगोली प्रतिनिधी

दैनिक सामना चे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे दि 30/08/2020  रविवारी रात्री हृदयविकाराने निधन जाले आहें पाटील हे 41वर्षाचे होते अशे अचानक निघून गेल्या मुळे हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहें   योगेश पाटील यांना संभाजी नगर येथील नदलाल धुत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर विलास मगरकर यांच्या सह त्याची टीम पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी पर्यंत करत होते मात्र पाटील गेल्या 24  तासा पासून सुरू असलेली मूर्त्यूशी झूज संपली योगेश पाटील यांच्या पार्थवर आज दुपारी संभाजीनगर येथें अत्यंतसंस्कार करण्यात येतीत त्यांच्या पश्वात पत्नी एक दिड वर्षाचा लहान  मुलगा आहें आई तीन भाऊ बहीण असा त्याचा परिवार आहें ते आधी धर्माबाद जिल्हा नांदेड येथें तालुका प्रतिनिधी नंतर सामना च्या नांदेड कार्यालयात शहर प्रतिनिधी पुढे उत्तम महाराष्ट्रत जळगाव येथें जिल्हा प्रतिनिधी आणि आत्ता मराठवाड्यातील हिंगोली येथें जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील म्हुनून  ते काम पाहत होते अत्यंत निर्भर आणि आपल्या लेखनी तून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्याची नेहमीच धडपड असायची हिंदुत्ववादी आक्रमक धारदार लेखणीने प्रसिद्ध असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठ ठोठावलले आमचे मार्गदर्शक कधी रागाने परंतु लगेचच प्रेमाने हाक देणारे दैनिक सामनाचा एक निर्भय पत्रकार अर्धवटरीती सोडून गेला आपन मागील खुप वर्षा पासून मार्गदर्शन केले आपन असे अचानक निघून गेलात साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 

शोशकूल . अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार  संघटना हिंगोली

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयाचे लोकार्पण ना. राजेश टोपे यांच्या हस्ते व धनंजय मुंडेंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न


बीड जिल्ह्याचा शेजारी म्हणून जिल्ह्यातील आरोग्यसुविधांसाठी मला कधीही आवाज द्या - ना. राजेश टोपे

जिल्ह्याच्या आरोग्यसुविधांमध्ये तडजोड होणार नाही, निधीही कमी पडू देणार नाही - ना. धनंजय मुंडे

अंबेजोगाई (प्रतिनिधी) :- (दि. ३१) ----- : अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० बेडच्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे आज राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या रुग्णालयाच्या निर्मितीने कोविडविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार असून आरोग्य सुविधांमध्ये हे रुग्णालय मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत यावेळी बोलताना ना. राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

बीड जिल्ह्याचा शेजारी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा मित्र म्हणून बीड जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी मला कधीही आवाज द्या, राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी सदैव बीड जिल्ह्यातील समस्यांना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे असे यावेळी ना. टोपे म्हणाले.

बीड जिल्ह्यातील कोविड विरुद्धच्या लढ्यात अत्यंत कमी वेळेत उभारण्यात आलेल्या या कोविड रुग्णालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली असून रुग्णांना योग्य व वेळेत उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे. आरोग्य विभागाकडून, जिल्हा नियोजन समितीतुन,  जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असा सर्व प्रकारांमधून निधी उपलब्ध केला आहे व पुढेही आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देऊ. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही; असे मत यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमासाठी आ. प्रकाश सोळंके, आ. संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, माजी आ. पृथ्वीराज साठे, श्री. नरेंद्र काळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आरोग्य उपसंचालक डॉ.माले, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर, श्री सचिन मुळूक, श्री राजकिशोर मोदी,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, दत्ता आबा पाटील, शंकर उबाळे, बबन लोमटे, राजपाल लोमटे, तानाजी देशमुख, विष्णुपंत सोळंके, बाळासाहेब शेप, कल्याण भिसे, रखमाजी सावंत, प्रशांत जगताप, विलास मोरे, अख्तर जहागीरदार, रणजित लोमटे, लोखंडी सावरगावचे सरपंच राजपाल देशमुख यांसह परिसरातील लोकप्रतिनिधी, सरपंच - उपसरपंच आदी उपस्थित होते.

आरोग्य विभागाकडून आणखी ३५ कोटी रुपये निधी अपेक्षित

यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधत जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजनांसाठी आणखी ३५ कोटी रुपये निधी अपेक्षित असून तो तातडीने मंजूर करण्यात यावा, याबाबत विनंती केली. तसेच माजलगाव येथे उपजिल्हा रुग्णालय निर्मिती, जिल्हा रुग्णालयात २०० खाटा वाढवणे यांसह जिल्ह्यातील अन्य उपाययोजनांबतही मागणी केली.

यावेळी ना. राजेश टोपे यांनी ३५ कोटी रुपये निधी मंजूर करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील अन्य सर्वच मागण्यांबाबत आरोग्य विभाग सकारात्मक असून लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वस्त केले.

ना. धनंजय मुंडे यांनी अत्यंत कमी वेळेत हे रुग्णालय उभे करण्यासाठी काम केलेल्या सर्व घटकांचे व प्रशासकीय यंत्रणांचे कौतुक करत जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानले.

संपूर्ण रुग्णालयाचा घेतला आढावा

कोनशीला लोकार्पण झाल्यानंतर ना. धनंजय मुंडे यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डांना भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर्स, स्वच्छता, मनुष्यबळ, उपचार पद्धती, उपलब्ध साधनसामग्री व औषधसाठा यासह सर्व बाबींची माहिती व बारकावे ना. मुंडे यांनी समजून घेत आवश्यक सूचना केल्या.

मेहकर येथे JEE- NEET परीक्षा पुढे ढकलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

मेहकर - ३१ (जमील पठाण) 

 मेहकर तालूका शहर काँग्रेस च्या सयूंक्त विद्दमाने आज उपविभागीय कार्यालया समोर काँग्रेस पक्ष्यांच्या वतीने प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले या वेळी भाजप केंद्र सरकार च्या विरोधात प्रचंड घोषणा बाजी करून निषेध करण्यात आला . या आंदोलनामध्ये शामभाऊ उमाळकर , पक्ष नेते अँड. अनंत वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. 
                देशभरात कोरोना विषाणूचे संक्रमण अजून कायम असून हा धोका अद्दपाय कमी झालेला नाही. दररोज हजारोच्या संख्येने कोरोना रुग्णांची भर पडत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी गर्दी टाळणे , हा एक महत्त्वाचा उपाय सरकारनेच सुचविलेला आहे . गर्दीमुळे कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊनच आपण गणेशोत्सव, दहीहंडी सारखे सण साधेपणाने साजरे केले आहेत . देशभरात आज ही गंभीर परिस्थिती आहे . अश्यावेळी लाखो विद्यार्थ्यांना JEE-NEET ची परीक्षा देण्यासाठी आग्रह करणे हे संयुक्तक नाही .परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही नाही . एका परीक्षा केंन्द्रात शेकडो विद्यार्थी, परीक्षा घेण्यासाठी लागणारे शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचारी एकत्र आल्यास कोरोना कोरोना संक्रमण होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार ने लाखो विद्यार्थी, पालक व परीक्षेशी निगडित इतर घटकांच्या  आरोग्य व भवितव्याच्या विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा. करिता या मागणी करीत हे आंदोलन करण्यात आले 
या प्रसंगी महा .प्र. काँ. स. शामभाऊ उमाळकर पक्ष नेते, अँड.अनंत वानखेडे भिमशक्ती चे भाई कैलास सुखदाने , डिगांबरराव मावळ, वसंतराव देशमुख, शैलेश बावस्कर,प्रा. संजय वानखेडे, यासिन कुरेशी ,प्रा. विनोद पऱ्हाड, वसीम कुरेशी, जुबेर नाजीम कुरेशी, डॉ. भरत आल्हाट , अँड. गोपाल पाखरे ,युनुस पटेल, आशुतोष तेलंग, सुखदेव ढाकरके रियाज कुरेशी, जुबेर कुरेशी, आशिष देशमुख, आकाश अवसरमोल, सुनील अंभोरे, सिद्धर्थ वाढोरे , भारत खिल्लारे, संदीप वाकोडे, सागर मुळे , शेख फैयाज, सागर सरकटे, इत्यादी असंख्य कार्यकर्ते आंदोलना मध्ये सहभागी होते

सामना चे हिंगोली प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराने निधन


हिंगोली प्रतिनिधी

दैनिक सामना चे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे दि 30/08/2020  रविवारी रात्री हृदयविकाराने निधन जाले आहें पाटील हे 41वर्षाचे होते अशे अचानक निघून गेल्या मुळे हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहें   योगेश पाटील यांना संभाजी नगर येथील नदलाल धुत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर विलास मगरकर यांच्या सह त्याची टीम पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी पर्यंत करत होते मात्र पाटील गेल्या 24  तासा पासून सुरू असलेली मूर्त्यूशी झूज संपली योगेश पाटील यांच्या पार्थवर आज दुपारी संभाजीनगर येथें अत्यंतसंस्कार करण्यात येतीत त्यांच्या पश्वात पत्नी एक दिड वर्षाचा लहान  मुलगा आहें आई तीन भाऊ बहीण असा त्याचा परिवार आहें ते आधी धर्माबाद जिल्हा नांदेड येथें तालुका प्रतिनिधी नंतर सामना च्या नांदेड कार्यालयात शहर प्रतिनिधी पुढे उत्तम महाराष्ट्रत जळगाव येथें जिल्हा प्रतिनिधी आणि आत्ता मराठवाड्यातील हिंगोली येथें जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील म्हुनून  ते काम पाहत होते अत्यंत निर्भर आणि आपल्या लेखनी तून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्याची नेहमीच धडपड असायची हिंदुत्ववादी आक्रमक धारदार लेखणीने प्रसिद्ध असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठ ठोठावलले आमचे मार्गदर्शक कधी रागाने परंतु लगेचच प्रेमाने हाक देणारे दैनिक सामनाचा एक निर्भय पत्रकार अर्धवटरीती सोडून गेला आपन मागील खुप वर्षा पासून मार्गदर्शन केले आपन असे अचानक निघून गेलात साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

शोशकूल . अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार  संघटना हिंगोली

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

नवनियुक्त शिक्षकांना सहाय्यक शिक्षक पदनाम देऊन नियुक्ती आदेश सुधारीत करा.


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी.
मागील काही दिवसातच पवित्र पोर्टल मार्फ़त शिक्षकांची भरती करण्यात आली आहे.परंतु ह्या नवनियुक्त शिक्षकांना जुने शिक्षण सेवक हेच पदनाम देण्यात आले मुळात 14 मे 2012 मध्ये शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार ह्या पदाचे नाव सहाय्यक शिक्षक(परिविक्षाधीन) अस करण्यात आल आहे असं असुन सुद्धा शासन अजुनही नवनियुक्त शिक्षक यांना सेवक म्हणुन हिनवत आहे लवकरच ह्या पदाचे पदनाम सहायक शिक्षक(परिविक्षाधीन) करण्यात याव अश्या प्रकारचे निवेदन परमेश्वर इंगोले राष्ट्रवादी प्रदेश सचिव यांनी आयुक्त विशाल सोळंकी यांना दिले आहे.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

जयपूर ग्रामपंचायत प्रशासक पदी श्री माधव कोकाटे (स .गटविकास अधिकारी यांनी स्वीकारला पदभार


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील जयपुर येथील ग्रामपंचायत प्रशासक  पदी श्री .माधव कोकाटे (स.गटविकास अधिकारी )प.स.सेनगाव   यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करताना मा.सरपंच श्री .प्रविन सु  पायघन सौ.सिताबाई पायघन सरपंच श्री .शिवाजी पायघन उपसरपंच ,श्री मदन पायघन श्री संतोष टोनपे  श्री अनिल कळबें श्री.सुरेश आघम साहेब  सौ.तुळसा ढोले सौ.चंद्रभागा पायघन सौ.चंद्रकला लांभाडे श्रीमती दगडाबाई घनघाव सौ.मंगलाबाई पायघन प.स.सदस्य सौ.ज्योती पायघन श्री अमरदास पारीस्कर पो.पा.श्री लक्ष्मण पायघन श्री रविदत्त पायघन चेरमन श्री संदिप काळे ग्रामविकासअधिकारी श्री संतोष पारीस्कर ग्रामसेवक श्री पंढरी भोने श्री ज्ञानेश्वर पायघन श्री विठुल पायघन श्री संतोष पंडित नाथराव पायघन वसतां पायघन दळवी डाॕ.गजानन पायघन श्री विजय पायघन श्रीमती लक्ष्मी पायघन   आदी गावकरी मंडळी उपस्थितीत होती 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी वैजनाथ गुट्टे यांची निवड


वैजनाथ गुट्टे यांच्या निवडीचे सर्वस्तरातुन अभिनंदन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीसपदी वैजनाथ गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. यानिवडीचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ सांगळे यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यानिवडीबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गुट्टेवाडी येथील व नेहमीच गोरगरीबांच्या कार्यासाठी धडपडणारे व्यक्तीमत्व तसेच सामाजिक कार्यात सक्रीय योगदान देणारे वैजनाथ सोनबा गुट्टे यांची नुकतीच यांच्या कार्याची दखल घेऊन आकांशा फाऊंडेशन प्रणित, एक लढा लोकहितांसाठी, आपल्या माणसांसाठी... स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ सांगळे यांनी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीसपदी नियु्नती एका पत्राद्वारे जाहिर केली आहे.
यानिवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष विजय बडे, योगेश केंद्रे, संतोष टाक, अंजली जावळेकर, सोनम अदाने सारिका, गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक भागातील नागरिकांनी सोशल मिडीयाच्या व मोबाईल दुरध्वनीच्या माध्यमातुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात सेनेचे कार्या वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. तसेच दिनदुबळ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी व सामजिक कार्यात योगदान देणार असल्याचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस वैजनाथ गुट्टे यांनी सांगितले. तसेच सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पिटलचे सोमवारी होणार लोकार्पण


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) (दि. ३०) ---- : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० खाटांच्या अद्ययावत कोविड हॉस्पिटलचे सोमवारी (दि. ३१) दुपारी एक वाजता लोकार्पण होणार आहे.

जिल्ह्यात वाढलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत कमी वेळेत बळ मिळवून दिले आहे. व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स, अँटिजेन रॅपिड टेस्टिंग यासह विविध सुविधांसाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

वाढत्या रुग्ण संख्येमुळे अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात १००० खाटांचे सर्व सोयीसुविधा युक्त, प्रशस्त व अद्ययावत रुग्णालय अत्यंत कमी वेळेत जिल्हा आरोग्य विभागाने उभे केले आहे.

या रुग्णालयाचे लोकार्पण ना. राजेश टोपे यांच्या हस्ते दुपारी एक वाजता ऑनलाईन होणार असून या कार्यक्रमासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिवकन्या शिरसाट, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. सतीश चव्हाण, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, आ. विनायक मेटे, आ. लक्ष्मण पवार, आ. संजय दौंड, आ. नमिता मुंदडा, आ. विक्रम काळे, आ. संदीप क्षीरसागर, जि. प. उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी आ. पृथ्वीराज साठे, लोखंडी सावरगाव चे सरपंच राजपाल देशमुख तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात आदी उपस्थित असणार आहेत.

असे असेल कोविड रुग्णालय :

रुग्णालयातील एक हजार खाटापैकी २५० खाटांचे कोवीड केअर सेंटर असेल, २५० खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असेल; २५० खाटापैकी २०० खाटावर ऑक्सिजनची व्यवस्था असेल. तसेच उर्वरित ५०० खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असेल यामध्ये ३०० खाटांना ऑक्सिजनची सुविधा असेल. या हॉस्पिटलमध्ये ७० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करण्यात आले आहेत.

या रुग्णालयासाठी डॉक्टर्स, अन्य स्टाफ असे जवळपास ६० जणांचे मनुष्यबळ उपलब्ध असणार आहे. रुग्ण संख्या वाढल्यास ही संख्या देखील वाढविण्यात येईल तसेच  अंबेजोगाई, परळी, माजलगाव, वडवणी, केज, धारूर या तालुक्यातील सरकारी व खाजगी डॉक्टर्सनाही आवश्यकतेनुसार याठिकाणी सेवा देण्यास बोलवण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.

पोलीस कर्मचाऱ्याचे सापडलेले पॉकेट 20 हजारासह केले परत!
प्रमाणिकपणाबद्दल सुदर्शन पुरी यांचा सत्कार

परळी वैजनाथ / प्रतिनिधी

जिवंत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवणारे अनेक व्यक्तिमत्व आजही समाजात आहेत. असेच काहीसे उदाहरण परळीत घडले. पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते हे परळीवरून आपल्या गावी मोटारसायकलवर जात असतांना त्यांच्या खिशातील पॉकेट रस्त्यावर पडले. त्यांच्या पाठोपाठ प्रवासात असलेले माजी सैनिक सुदर्शन पुरी यांच्या निदर्शनास आले. आढळलेल्या कागदपत्रांवरून पुरी यांनी संपर्क करून दिलीप गित्ते यांना ते परत केले.

पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते हे आपल्या गाडीवर गावाकडे परळी-मालेवाडी जात असताना त्यांच्या खिशातील पॉकेट रस्त्यावर पडले. हे मागावरून जात असलेले सुदर्शन पुरी यांच्या नजरेस पडले. त्यांनी संपर्क करून दिलीप गित्ते यांचे हरवलेले पॉकेट परत केले. हरवलेल्या पॉकेटात 20 हजार रुपये आणि महत्वपूर्ण कागदपत्रे होते. पुरी यांच्या प्रमाणिकपणामुळे पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते यांना त्यांचे महत्वपूर्ण कागदपत्र परत भेटू शकले आहेत. सुदर्शन पुरी यांच्या प्रमाणिकपणाबद्दल त्यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष महादेव शिंदे, पत्रकार दत्तात्रय काळे यांनी सत्कार केला.

राज्यातील मागसवर्गीय अनुदानित वस्तीगृहात कार्यरत कर्मचारी यांचे वेतन श्रेणी व तद अनुषंगिक इतर लाभ द्या


हिंगोली प्रतिनिधी 

निलेश नेताजी शिंदे यांचे मा .परमेश्वर जि इंगोले पाटील प्रदेश सचिन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र राज्य यांना पत्र 

 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत २३८८ अनुदानित वस्तीगृहे स्वयंसेवीसंस्थामार्फत चालविली जातात. याच धर्तीवर राज्यातील स्वयंसेवी संस्थेमार्फत  वि.जा.भ.ज./ आदिवासी खात्याच्या आश्रम शाळेला जोडलेली वसतिग्रुह कार्यरत आहेत.या आश्रमशाळेशी संलग्न वस्तीगृहातील  पदे नियमित वेतनश्रेणीवर कार्यरत आहेत. परंतु सामाजिक न्याय व विशेष सहाय्या मार्फत चालविण्यात येत असलेल्या अनुदानित वसतिग्रुहातील कर्मचा-यांना २४ तास काम करून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे . 
            या अनुदानित वस्तीगृहातील कर्मचा-यांना सद्या अधिक्षक ९२००/-, स्वयंपाकी ६९००/-, मदतनीस व चौकीदार यांना ५७५०/-, दरमहा मानधन दिले जाते.
           तसेच या वस्तीगृहातील  कर्मचा-यांना रजा,वैद्यकीय सह इतर कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत.काममात्र २४ तास तेही अत्यंत तुटपुंज्या मानधनात करावे लागत आहे.
              शासनास संपुर्ण राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण करणे शक्य नसल्याने आश्रमशाळेशी जोडलेली वस्तीगृह व अनुदानित वस्तीगृहे अस्तित्वात आलेली आहे. शासकीय वस्तीगृहे,शासकीय निवासी शाळा, वि.जा.भ.ज./ आदिवासी आश्रमशाळा संलग्न वस्तीगृहे,अनुदानित वस्तीगृहे या सर्वाचे कार्य त्यात शिकणाऱ्या मुलांचे वयोगट, वर्ग समान आहेत. परंतु वेतनात मात्र प्रचंड तफावत आहे.
           दि.  ९ एप्रिल २०१३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत सदरील कर्मचा-यांना नियमित वेतनश्रेणीत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावेळी २ महिन्यात फेर प्रस्ताव सादर करण्यात यावा असा निर्णय झालेला आहे. दिनांक ०६/१०/२०१८ च्या अर्थ विभागाच्या टिपणीत वेतनश्रेणीचा प्रस्ताव खात्यामार्फत मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा असे नमूद आहे.
  वास्तविक पाहता समान काम समान दाम या तत्वावर या वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे अपेकक्षित आहे तरी या वस्तीगृह कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत आपल्या प्रयत्नातून सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व  प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य ,शिक्षक प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटना  पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात

सरपोद्दार शालेय ग्रंथालयातर्फे विद्यार्थ्यांना करिअर विषयक अनोखे मार्गदर्शनमुंबई:-  सध्याच्या कोरोना साथ आजारात शाळा बंद आहेत पण आँनलाईन शिक्षण चालू आहे. यातच नुकतेच दहावीचे निकाल लागलेत . अशांसाठी व शाळेत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांना दिशादर्शन होईल  असा उपक्रम  सायन येथील शीव शिक्षण संस्था संचालित  डी.एस . हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक अंकुश महाडिक यांच्या सहकार्याने  राबविण्यात येत आहे .झूम दूरदुश्य संवाद प्रणाली व फेसबुक समाजमाध्यमाच्या आधारे शाळेच्या सरपोद्दार ग्रंथालयाच्या मुख्य ग्रंथपाल व या कार्यक्रमाच्या प्रमुख सौ. मनिषा कडव आहेत.  वाटा स्वयंरोजगाराच्या या अनोख्या उपक्रमात  शाळेतील इयत्ता आठवी नववीचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी  करिअर विषयक प्रश्नोत्तरे  शाळेचे माजी विद्यार्थी जे आज  अनेक क्षेत्रात आपले करिअर घडवित आहेत त्यांस  त्या क्षेत्रात येण्यासाठी  काय करावे लागते याचे मार्गदर्शन झूम दूरदुश्य संवाद प्रणालीव्दारे फेसबुक समाजमाध्यमाच्या मार्फत थेट प्रक्षेपण शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मुलाखतीचा कार्यक्रम पोहोचवला जात आहे .
आतापर्यंत मुलाखतीची चार पुष्पे झाली असून मरीन इंजिनीअर , डॉक्टर ,धातू अभियांत्रिकी या क्षेत्रांची माहिती  या क्षेत्रातील करिअर संबधीचे मार्गदर्शन  शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी  केलेले आहे . व त्यास शाळेतील विद्यार्थी व पालक माजी विद्यार्थी यांचा उदंड प्रतिसाद या उपक्रमास दिला आहे. असे शाळेच्या ग्रंथपाल सौ.मनिषा कडव यांनी कळविले आहे.

Sunday, 30 August 2020

रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम पाहून ग्रुपने अवयव दानासाठी पुढे यावे

- उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्यक्त केली अपेक्षा


अरुणा शर्मा


पालम :- संचारबंदीच्या काळात कुठेही रक्तदान शिबिरे झाले नाही; परंतु आपले पालम, या व्हाट्सअप ग्रुपने रक्तदान शिबिर घेऊन एक आदर्श निर्माण करत सामाजिक बांधिलकी जपली. म्हणून या ग्रुपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आता त्यांनी अवयव दानासाठी पुढे येऊन संकल्प करावा, अशी अपेक्षा गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी बोलताना व्यक्त केले
   गणेशोत्सवानिमित्त पालम शहरात 30 ऑगस्ट रोजी आपले पालम व्हाट्सअप ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. व्यासपीठावर  ह.प भ. भागवताचार्य नारायण महाराज पालमकर, पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे, गट विकास अधिकारी एम.डी. धस, नगरपंचायत चे मुख्याधिकारी संतोष लोमटे, डॉ. बालाजी हिप्पर, डॉ. निलेश दळवे यांची उपस्थिती होती. 
     श्री. पाटील पुढे म्हणाले की, संचार बंदीमुळे रक्तदान सहसा होत नाही. म्हणून या ग्रुपने केलेल्या रक्तदान शिबिराचे मोल अधिक आहे.  अशा शिबिरातून झालेल्या रक्त संक्रमणामुळे अनेक रुग्णांचे आयुष्य उभा राहणार आहे त्यामुळे हे एक पुण्यकर्मच आहे. आता भविष्यातील गरज ओळखून या ग्रुपने अवयव दान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कारण अवयव दानातून गरजवंतांचे आयुष्य उभा राहते. अवयव दाता मृत्यूनंतरही या जगात अवयव रूपातून जिवंत राहतो. म्हणून या ग्रुपने अवयवदानाची एक चळवळ उभा करावी, अशी अपेक्षा श्री पाटील यांनी व्यक्त केली. या शिबिरात युवकाने उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. म्हणून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. विशेषतः महिलांनीही सहभाग नोंदविला. एकूण 125 जणांनी रक्तदान केले. शिबिरासाठी आपले पालम ग्रुपचे एडमिन मारुती नाईकवाडे, गुलाबराव सिरस्कर, विलास चव्हाण, बाबाराव आवरगंड, रामप्रसाद कदम, राजकुमार गडम, आनंद साखला, शिवाजी शिंदे, भगवान सिरस्कर, राहुल गायकवाड, गजानन देशमुख, झेटींग पाटील, शंकर कनावार, डॉ. चेतन साखरकर, डॉ. महेश कोकाटे, संतोष लोमटे, शिवा रोकडे, रोहितकर आदींनी परिश्रम घेतले.

वाघ्या -मुरळी परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास टोणपे


सुभाष मुळे..
-----------------
गेवराई, दि. ३० _ पोवाडा, गोंधळी, वासूदेव, वाघ्या -मुरळी आदी लोककलेचे कलावंत कैलास शिवाजीराव टोणपे यांची महाराष्ट्र राज्य वाघ्या -मुरळी परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
       कैलास टोणपे हे आर.बी. अट्टल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कलावंत आहेत. त्यांनी महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यापीठाचा युवक महोत्सव यामधून आपल्यातील लोककलावंत घडविला. आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, राज्य शासनाचा क्रीडा विभागाचा राज्य युवा महोत्सव गाजवून अनेक पारितोषिके पटकावलेली आहेत. नवरात्रौत्सव, गणेश उत्सव असो की रेणुकादेवी मंदिरातील दैनंदिन भजन -कीर्तन, जागरण - गोंधळ कार्यक्रमात सहभाग, पोवाडा, वासूदेव, लावणी, गोंधळ, वाघ्या -मुरळी आदी लोककला प्रकारात नावलौकिक मिळवलेला आहे. शाळा -महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातील कलाकारांचा सराव, नियमित गीत -संगीत कार्यक्रम, आकाशावाणी, युट्यूबवर अनेक लोकगीतांचे कार्यक्रम सुरू असतात. आळंदी ते पंढरपूर पायीवारी सोहळयात लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन अनेकदा करीत आहेत.
या सर्व गोष्टींची दखल घेत महाराष्ट्र राज्य वाघ्या -मुरळी परिषदेचे राज्य अध्यक्ष प्रा.मार्तंड साठे यांनी जिल्हाध्यक्ष  रावसाहेब कांबळे यांच्या शिफारशीवरुन लोककलावंत कैलास टोणपे यांची परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी आ. अमरसिंह पंडित, आ. लक्ष्मण पवार, प्राचार्या डॉ. रजनी शिखरे,नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, जेष्ठ नाटककार अॅड. कमलाकर देशमुख, अॅड. सुभाष निकम, संगीत विशारद शिवाजी गायकवाड, चित्रपट अभिनेते डॉ. सुधीर निकम, ज्ञानेश्वर मोटे, शाहीर रामभाऊ मुळे, शाहीर विलासबापू सोनवणे, प्रा. राजेंद्र बरकसे, आमचे पत्रकार सुभाष मुळे आदींनी कैलास टोणपे यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

कुटुंबाचा विचार करा.. गाफील राहून पत्रकारिता करू नका - वसंत मुंडे

सुभाष मुळे..
----------------
 गेवराई, दि. ३० _ स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून, पत्रकारांनी जागृत राहायलाच पाहिजे, त्याशिवाय आता पर्याय नाही. संकटे सांगून येतात का ? असा खडा सवाल उपस्थित करून , आपण गाफील राहील्याने आपले कुटुंब उघड्यावर पडते, याचा गांभीर्याने  विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी येथे बोलताना केले असल्याची माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांनी दिली.
    शनिवार, दि. 29 रोजी दुपारी दोन वाजता गेवराई येथील जेष्ठ पत्रकार स्व. संतोष भोसले यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार संतोष मानुरकर, मराठवाडा विभागाचे बीड जिल्हा अध्यक्ष वैभव स्वामी यांची उपस्थिती होती. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण स्वतः विषयी गाफील असतो. बातमीसाठी वेळ देणारे पत्रकार स्वतःला, कुटुंबाला का वेळ देत नाहीत  ? हा प्रश्न आहे. कुटुंब प्रमुख म्हणून, आपली जबाबदारी नीटपणे पार पाडण्यासाठी, समाजाला शिक्षण देणाऱ्या पत्रकारांनाच मार्गदर्शन करण्याची वेळ येते, तेव्हा मनाला वेदना होतात, अशी कबुली देऊन ते म्हणाले की, आयटी च्या दशकात आपण ही स्मार्ट व्हायला नको, किती वेळ हात पुढे करायचा. त्याला काही अर्थ आहे का, त्यापेक्षा सजग नागरिक म्हणून स्वतःच्या हिमतीवर उभे राहून, देणारे म्हणून आपली ओळख निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी, एकत्रीत या,  संवादातून पत्रकारांच्या आर्थिक विकासाचा मुद्दा निकाली निघू शकतो. अशक्य असे काही नाही. त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. जे होताना दिसत नाहीत. ही खेदाची बाब आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना असंख्य अडचणी येतात, याचा मला ही अनुभव आहे. जाहीरात सोडता, आर्थिक सोर्स नसतो. जाहीरात मिळाली की, आपणाला मिंदेपणा येतोच,  हे वास्तव आहे. म्हणून , बातमीतले सत्य सांगून, समाजाच्या वेदनेवर आपणाला बोट ठेवता येईल, याचा विचार करण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी सांगितले. साप्ताहिक, अर्ध साप्ताहिकाचे मूल्य वाढण्याची गरज आहे. अंकाला येणारा खर्च आणि वृत्तपत्र विक्री चे मूल्य, यामध्ये खूप तफावत आहे. याचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त करून, त्यांनी सांगितले की, स्व.भोसले यांच्या सारखा तरूण पत्रकार कोरोना सारख्या आजाराच्या भितीचा बळी ठरला. चार पत्रकारांचे कोरोना महामारीने बळी घेतला असून, राज्य सरकारने पत्रकारांना पन्नास लाख रुपयांची विमा योजना जाहीर करावी म्हणून, आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले आहेत. त्याला यश मिळाले आहे. तरीही, सरकारच्या काही जाचक अटी शिथील करण्यासंदर्भात आमचा पाठपुरावा सुरू आहे. सरकारने पत्रकारांच्या बाबतीत लवचीक भूमिका घेऊन, त्यांच्या कुटुंबाला आधार मिळवून देण्यासाठी नेटाने आपण प्रयत्न करणार असल्याचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे यांनी शेवटी बोलताना सांगितले. 
यावेळी पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना पालन केल्यास कोरोनावर मात करता येते - ऐश्वर्या गिरी

----------------------------------------
प्रा.डॉ. संतोष रणखांब, तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
 सोनपेठ : सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रशासन अथक परिश्रम करीत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर शर्तीचे प्रयत्न करत आहे, अशा प्रसंगी नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे योग्य रीतीने पालन केल्यास कोरोना साथीवर मात करता येते, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे, तरी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन परिविक्षाविधिन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी केले आहे. त्या उपचारासाठी दाखल असलेल्या सहाजणांनी कोवीडवर यशस्वी मात करुन आपल्या घरी परतले, त्यावेळी शुभेच्छा देऊन तेजन्यूज हेडलाइन्स च्या प्रतिनिधीशी बोलत होत्या.
सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती मध्ये कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. आधी या ठिकाणी फक्त विलगीकरण कक्ष होता व संशयित रुग्णांना येथे विलगीकरणासाठी ठेवण्यात येत होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गंभीर लक्षणे  नसलेल्या कोरोना बाधीत रुग्णांना या ठिकाणी ठेवण्यात येत होते . या ठिकाणी आता पर्यंत दहा कोरोना बाधीत रुग्णांना ठेवण्यात आले होते. यातील सहा रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर त्याची कोवीड चाचणी निगेटिव्ह झाल्यावर त्यांना रुग्णालयातुन दि.३० रोजी घरी सोडण्यात आले. कुरणा सात रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अतिशय सतर्क होऊन काम करत आहे.
या वेळी तालुका प्रशासनाच्या वतीने परिविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी सर्व रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी रुग्णालय अधिक्षक डॉ.सिध्देश्वर हालगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष पवार,रवींद्र देशमुख, सुधीर बिंदू,  गणेश पाटील,डॉ. सचिन कस्पटे, डॉ. कपिल महाजन, मेनका लांडे,मिनल भदाडे,नेहा पवार, साईनाथ पांचाळ गृृृहरक्षक दलाचे विजय मस्के यांच्या सह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते . याप्रसंगी रुग्ण भावुक झाले होते, डॉक्टरांनी रुग्णांना घरी गेल्यावर काळजी घेण्या बाबत योग्य ते मार्गदर्शन केले.

मतदारसंघाच्या विकासासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- आमदार गुट्टे

 

अरुणा शर्मा


पालम :-विकासापासून दुर असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणून मतदार संघातील तिनही तालुक्यात विकासाचा बॅकलाक भरुन काढण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार डाँ. रत्नाकरराव गुट्टे यांनी केले.
गंगाखेड येथे रासप आणि आमदार डाँ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाची पदाधिकार्‍यांची व्यापक बैठक संपन्न झाली. व्यासपीठावर रासपचे जिल्हाअध्यक्ष अँड संदीप अळनुरे, आमदार गुट्टे काका मित्रमंडळाचे पालम पुर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड चे प्रभारी हनुमंत मुंडे, आमदार गुट्टे साहेब यांचे स्वीव सहायक विठल सातपुते, तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे, रासप तालुका अध्यक्ष बाळासाहेब पौळया बैठकीत विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या या सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा आमदार डाँ. रत्नाकरराव गुट्टे यांच्याहस्ते सत्त्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघ विकासाबाबतीत किती मागे राहिला आहे याची कल्पना देत मतदारसंघातील गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तालुक्याचा समतोल विकास करण्यासाठी, शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी पदाधिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार डॉ.रत्नाकरराव गुट्टे यांनी केल. सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे स्वागत करुन पक्षाची ध्येयधोरणे जास्तीत जास्त नागरिकां पर्यंत पोहोचविण्यसाठी प्रयत्न करावेत असेही आमदार गुट्टे यांनी पदाधिकार्‍यांना आवाहन केले यावेळी
रासपच्या जिल्हा सरचिटणीस पदी गणेश राव घोरपडे, मित्र मंडळाच्या शहर अध्यक्षपदी असदखाँ पठाण, रासपच्या शहराध्यक्षपदी दत्तराव घोरपडे, जिल्हा संघटक पदी बाबासाहेब एंगडे, जिल्हा कोषाध्यक्षपदी विजय शिंदे, तालुका सरचिटणीस पदी गोपाळ देवकते, तालुका युवा अध्यक्ष पदी भगवान शिरस्कर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी तायरखाँ पठाण, दलित आघाडी तालुकाध्यक्षपदी राहुल शिंदे, किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत पोळ, युवा शहर अध्यक्ष पदी गोस कुरेशी, ओबीसी तालुकाध्यक्षपदी गजानन भस्के, युवा तालुका संघटकपदी चंद्रकांत गायकवाड, अल्पसंख्यांक युवा शहर अध्यक्षपदी पिरखाँ पठाण, शहर अध्यक्ष शेख बशीर, विधान सभा ऊपाध्यक्ष विनोद किरडे,  गणेशराव दुधाटे, बाळासाहेब कराळ, विश्वजीत स्वामी,भारत शिंदे, शंकर साबळे, बंडू राठोड, नवनाथ पौळ, गंगाधर डुकरे, विनायक पौळ, धनंजय कदम, शिवलिंग खेडकर, सदाशिव शिंदे, शिवराम पैके, पुरुषोत्तम लांडगे, काशिनाथ कदम, महेश बाबर आदींची निवड करण्यात आली बैठकीला रासप मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आॅल इंडिया उलमा बोर्डच्या मिडीया सेल मराठवाडा अध्यक्षपदी मोईन खान यांची निवड

परभणी : प्रतिनिधी 
जिल्हयातील सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रात सदा अग्रेसर राहणाºया तथा                पत्रकारीता क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत असणाºया पठाण मोईन अहेमद खान यांची आॅल इंडिया उलमा बोर्डच्या मिडीया मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
सदरील निवड ही त्यांच्या कार्याची पावती मानली जात ़असून आॅल इंडिया उलमा बोर्ड दिल्लीचे राष्टÑी़य अध्यक्ष शाही इमाम मौलाना नियाज कासमी, अल्लामा बुनाई हस्नी (वक्फ विंग), गुलाम रब्बानी (कोलकत्ता) यांच्या आदेशाने व  महाराष्टÑ प्रदेश अध्यक्ष शेख फैसल (औरंगाबाद) यांच्या स्वाक्षरीने मोईन खान यांची मिडीया सेल मराठवाडा अध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले. 
पत्रकारीतेच्या माध्यमातून शहरातील समस्या व अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम आपण करीत आहेत या पुढेही गोर गरीबांच्या प्रश्नांना वाचा फोडून शासन दरबारी मांडण्याचे काम या माध्यमातून करण्याची अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली. निवडीबद्दल ज्येष्ठ पत्रकार हमीद मलीक,पत्रकार महेमुद खान,बशीर अहेमद, सय्यद युसुफ,ज्येष्ठ समाजसेवक मोहम्मद अब्दुल बाखी, समाजसेवक मोहम्मद अब्दुला राज, कामरान खान, सय्यद सगीर, रिजवान खान, सोनू खान,अरमान खान आदींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथील बेलदरी व वाढोणा तलाव यावर्षी झालेल्या पावसाने भरला फूल

   

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 
   
राष्ट्रीय महामार्गावर लागणार्या मूरमामूळे झाला अधीक फायदा 

बेलदरी तलावामूळे पानकनेरगांव वासियांना होणार फायदा 

बेलदरी तलाव जवळच असलेली जलस्वराज्य विहीर तूडूंब पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

सेनगांव तालुक्यातील पानकनेरगांव येथील गेल्या ७  वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, या वर्षी संततधार पावसामुळे ८ वर्षांत पहिल्यांदाच बेलदरी व वाढोणा तलाव पूर्ण भरले आहे.

हे तलाव पूर्ण भरल्यामुळे परिसरातील शेतकर्यासाठी साठी संजीवनी ठरणार असून
फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे
व तसेच बेलदरी तलाव पाळूच्या जवळच असलेली पानकनेरगांव वासियांना पाणी पूरवठा करणारी जलस्वराज्य विहीर तूडूंब भरली विहीर तूडूंब भरल्याने जवळपास १४ हजार लोकसंख्येच्या पानकनेरगांव वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे 
त्यामुळे गावकरी व शेतकर्यातमधून समाधान व्यक्त केला जात आहे
दरवर्षी कमी प्रमाणात नैसर्गिक पर्ज्यन्यमान होत असल्याने
शेतकर्यांना शेतीसह पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उद्भवते
वरूणराजाकडे यावर्षी क्रूपा दाखवल्याने 
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव बेलदरी व वाढोणा तलाव १००/ भरला आहे
व तसेच गेल्या दिड दोन वर्षांपासून रिसोड ते सेनगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर लागत असलेल्या मूरूमासाठी चक्क कंन्ट्रकदारांनी वाढोणा तलावातील २६ फूट खोल खोदकाम करून मूरूम मार्गावर वापरण्यात आला त्यामुळे आज राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्यामूळे तलावाचा फायदा झाला आणि योगायोगाने यावर्षी पावसाने क्रूपा दाखवल्याने तलाव १००/ टक्के भरला आहे 
सेनगाव तालुक्यातील वाढोणा आणि बेलदरी  तलाव भरल्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. जवळपास २०११ पासून अपुऱ्या पाण्यामुळे हे तलाव भरलेच नव्हते. मात्र,२०१९ आणि २० वर्ष तलावासाठी लाभदायक ठरले
  यंदा आगस्ट मध्ये झालेल्या मूसळधार पावसाने या दोन्ही तलावामध्ये शंभर टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे जवळपास दोन वर्षे तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तलाव परिसरातील गावात बोरवेल तसेच विहिरींची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनाही यंदाचा रब्बी हंगाम समाधानकारक उत्पन्न देणारा ठरणार असल्याने शेतकरी मध्ये आनंदाचे वातावरण आहे
 बेलदरी वाढोणा तलावात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला असला तरी शेतकऱ्यांची काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे शेती भिजवण्याचा ऊपसा कोणीही  न केल्यास ऊन्हाळाभर जून महिन्यापर्यंत भटकत असलेल्या वन्य प्राणी, जनावरें व माणसांनाही पूढील पावसाळ्यापर्यंत जलसाठा राहू शकतो 

शामराव देशमुख,पंकज झूंगरे  पानकनेरगांव - सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर लागणार्या रस्त्यासाठी गौणखणीज माळावरील कंट्रकादार खोदकाम करत असतांना यांनी शंक्कल लढवून खूप मेहनत घेऊन कंट्राकदारांचा मोर्चा वाढोणा तलावाकडे वळवला आणी जेसीबीच्या साह्याने हजारो टिप्परन २५ ते २६ फूट खोल खोदून मूरूम महा मार्गावर वापरण्यात आला
 आणि त्यामुळे आज यांनी वेळी मेहनत घेतल्याने तलाव खोल झाल्यामुळे जलसाठा दोन वर्षे पूरेल ईतका साठा निर्माण झाला आहे आणि याचा अदी फायदा परिसरात झाला आहे

प्रतिक्रिया- शामराव देशमुख भाजप कार्यकर्ते

या वर्षी निसर्गाच् क्रूपेने सूरवातीपासून दमदार पाऊस झाला 
खरिप हंगामातील पिके बहरत आहेत त्यामुळे शेतकरी समाधानी आहे
आणि आता मागील आठवड्यात संततधार पाऊस झाला पून्हा चार ते पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पून्हा पावसाचे दर्शन झाले
त्यामुळे पानकनेरगांव परिसरातील विहिरी तलाव पाठ बंधारे तूडूंब भरले आहे
विहिरी तलाव पूर्ण भरल्यामुळे शेतकर्यांना रब्बी हंगामातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे त्यामुळे गहू हरभरा कापूस नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे हळद या वर्षी भरपूर शेतकर्यांना साथ देईल ही आशा आहे
परंतु आज बेलदरी तलाव पूर्ण भरल्यामुळे याच तलावाच्या भरोश्यावर जवळपासचे गावांना फायदा होईल आणी बेलदरी तलाव बाजूला जलस्वराज्य विहीर आहे याच विहिरीतून पानकनेरगांव १४ हजार लोकसंख्येच्या असलेल्या गावात पाणी पूरवठा केला जातो
त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे
परंतु नागरीकानी पाणी कसं जपून वापरता येईल याची  काळजी घेण गरजेचं आहे

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

Saturday, 29 August 2020

नूतन विद्यालयाची अनुष्का हिवाळे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम


सेलू, दि.२९( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का सुरेश हिवाळे हिने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त उदयगिरी महाविद्यालय उदगीर आणि दलित युवक आंदोलन व बेस्बा , पुणे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन महावक्ता २०२० या वकृत्व स्पर्धेत नूतन विद्यालयाला दुहेरी यश मिळवून देत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. गुरुवार ( ता.२७) रोजी या दोन्ही राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचा निकाल जाहीर झाला.
        उदयगिरी महाविद्यालय उदगीरच्या स्पर्धेत शालेय पातळीवर ' अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक सन्वयासाठीचे योगदान ' तर दलित युवक आंदोलन व बेस्बा, पुणे आयोजित खुल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महावक्ता २०२० या वकृत्व स्पर्धेत ' कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे साहित्यातील बंड ' या विषयावर अनुष्काने आत्मविश्वासाने मांडणी करून प्रथम क्रमांक पटकावला. यु ट्युबवरील अनुष्काच्या वक्तृत्वाचा व्हिडिओ चार हजार जणांनी बघितला. तिला यु ट्युबवर ९१५ लाइक , १९२ कॉमेंट तर फेसबुकवर १६२ लाइक व ६७ कॉमेंट मिळाले. एका कार्यक्रमात रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन अनुष्काचा गौरव होणार आहे. या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया , सचिव डि.के.देशपांडे, सहसचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर , जयप्रकाश बिहाणी , प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी , प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी , उपमुख्याध्यापक अशोक वानरे , पर्यवेक्षक रामकिशन मखमले, रघुनाथ सोन्नेकर , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवारात‌ अनुष्काचे कौतुक होत आहे.

फोटो ओळी : अनुष्का हिवाळे

पूर्ण..‌.

मंदिरे उघडावेत या मागणीसाठी पालम मध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन


मुख्यमंत्र्यांना 
तहसीलदारा मार्फत निवेदन 


अरुणा शर्मा


पालम :- राज्यभरात कोरोना महामारीमुळे गेल्या साधारण पाच महिन्यापासून महाराष्ट्रातील सर्व मंदिर बंद आहेत. त्यामुळे मंदिरात होणारे भजन-कीर्तन, पूजा-अर्चना भाविकांना करता येत नाहीत. हिंदु धर्मातील पवित्र असा पर्वकाळ सध्या चालू आहे व आशा पर्वकाळात भाविकांना मंदिरच बंद असल्याने जाता येत नाही. महाराष्ट्र सरकारने राज्यात दारूची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली पण मंदिर सुरू करण्यास अद्याप  परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सरकारला जागे करणार आहोत व सर्व भाविकांची भावना सरकारपर्यंत पोचवणार आहोत.
    अध्यात्मिक आघाडी भारतीय जनता पार्टी परभणी च्या वतीने सर्व कायद्याचे पालन करून दिनांक 29 आँगस्ट रोजी दुपारी 11 वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले. पालम मधील श्री संत मोतीराम महाराज मंदिर, हनुमान मंदिर, राम मंदिर, गणपती मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने तातडीने मंदिर सुरू करण्याची परवानगी द्यावी ही विनंती मुख्यमंत्र्यांना तहसीलदार पालम मार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण महाराज पालमकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन गणेशराव रोकडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजीराव टोले, भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष भागवत बाजगीर,  ह भ प कानिफनाथ महाराज टाक, ह भ प केशव महाराज पालमकर, पदुदेवा जोशी, शंकरशेठ कन्नावार, दिलीपशेठ रोकडे, इंद्रजित सराफ, रघुभैय्या रोकडे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------
केंद्र सरकारने जून महिन्यातच धार्मिक स्थळांना लाॅकडाऊन मधून वगळण्याच्या सूचना दिल्या होत्या, तरीही राज्य सरकारने अद्याप पर्यंत धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिलेली नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जेव्हा जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती, संकटे येतात तेव्हा एकूण सामाजिक मानसिकताही भयग्रस्त बनते, अशा दहशतीच्या परिस्थितीमध्ये समाजाला त्यांची आस्था धीर देण्याचे व संकट काळात परिस्थितीशी लढण्याचे बळ देते हे वास्तव आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाने या संकट काळात जनतेला मंदिर सुरू करून उपासना करण्याचे संविधानिक अधिकाराचे स्वातंत्र्य दिले पाहिजे - नारायण महाराज पालमकर, भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख.

आपले पालम व्हाट्सअप ग्रुप च्या वतीने उदया भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनसामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम


अरुणा शर्मा


पालम :- दानामुळे पुण्य मिळते; परंतु रक्तदानामुळे एखाद्याला नवजीवन प्राप्त होते किंवा त्याचा पुनर्जन्म झाल्यासारखा होतो. म्हणून गणेशोत्सवातील झगमगघाटामध्ये पैशाचा अपव्यय न करता सामूहिक रक्तदान करून अनेकांचे आयुष्य उभारू या ! असा उदात्त हेतू 'आपले पालम', या व्हाट्सअप ग्रुपने रक्तदान शिबिर ठेवून जपला आहे.
 त्याला जागत ग्रुपमधील तब्बल 101 मेंबरने दातृत्व दाखविले. म्हणूनच ग्रुपने आज रोजी पालम शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी दाखविली आहे.
 कोवीड महामारीच्या संकटात परभणी जिल्हा सामान्य रक्ताचा तुटवडा जाणवत होता. कारण मार्चपासून ते ऑगस्ट २०२० पर्यंत जिल्ह्यात कोठेही रक्तदान शिबिरे झालेली नव्हती. म्हणून रुग्णालयाने रक्तदात्यांना आवाहन केले होते. त्याला काही जणांनी प्रतिसाद दिला; पण तो अपुरा आणि अल्प होता. आजही फारसे चित्र पालटलेले नसेल, म्हणून पालम व्हाट्सअप ग्रुपने, यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी युवक एकत्र येतात, असा गणेश उत्सवाचा मुहूर्त साधला. त्यात शारीरिक अंतर पाळून रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय केला. त्याला ग्रुप मेंबरने लागलीच होकार दिला. शिवाय, पूर्वनोंदणी देखील करण्यास सुरुवात केली अन पाहता, पाहता तब्बल १०१ मेंबरने रक्तदानासाठी नोंदणी देखील केली. अद्यापही नोंदणी सुरूच असून कार्यक्रमापर्यंत .. रक्तदाते नोंदणी करतील, असा संकल्प ग्रुपने केला. त्याची तयारी जोरात सुरू आसुन हा कार्यक्रम उदया शहरातील डॉ. निलेश दळवे यांच्या जगदंब हॉस्पिटल मध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आली आहे. ते दुपारी १२ वाजता सुरू होईल. या होणाऱ्या कार्यक्रमाला  उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून ह भ प नारायण महाराज पालमकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या शिबिरात सहभागी होऊन गरजू व्यक्तीवर व रुग्णासाठी आपले रक्त कामी आणावे, असे आव्हान ग्रुपचे ॲडमिन मारोती नाईकवाडे, बाबाराव आवरगंड, विलास चव्हाण, रामप्रसाद कदम, डॉ. निलेश दळवी, डॉ. बालाजी हिप्पर, देवानंद हत्तींआबिरे, डॉ. प्रकाश कोकाटे, झेटिंग माणिकराव पाटील, साई गडम, डॉ. शेख बडेसाब, डॉ. गाडगीळ, अभय कुमार कदम, राहुल गायकवाड, राजकुमार गडम, महेश टाक, गजानन देशमुख, भगवान शिरस्कर, आनंद साखला, शिवाजी शिंदे, विनायक सूर्यवंशी, राम गावंडे यांनी केले आहे.

कोरोना संकटामुळे वडिलाची पुण्यतिथी साजरी करता येईना म्हणुन मुलाची बैचेनी

घाटमाथ्यावर वकिल साहेब नावाने परिचित कै. अॅड प्रभाकर दहिफळे 7 वे पुण्य स्मरण 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
   कोरोना संकटाने माणसाच्या सुख दुःख व्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आहे , वर्तमान काळात एकिकडे जिवंत आई वडिलांना जन्मदाते वृद्धाश्रम चा रस्ता दाखवू लागले अस असतांना यंदा वडिलाची 7 पुण्यतिथी दरवर्षी प्रमाणे साजरी करता येईना म्हणुन मुलाची बैचनी अस्वस्थता वाढली आहे , भाजपाचे कार्यकर्ते माधवराव दहिफळे यांचा बाबद घडत असून त्यांचे वडिल कै , प्रभाकर राव  यांचे सातवे पुण्यस्मरण आज आहे , मात्र त्यांना चार भिंतीच्या आत पुजा करावी लागत आहे , दरवषी हाळम ता .परळी गावात किर्तन आणि गाव भोजन असा कार्यक्रम ठेवत
   कै .प्रभाकर राव  बाबुराव दहिफळे हे हाळम ता. परळी गावचे रहिवासी. सात वर्षांपूर्वी हृदयविकाराने त्यांचं निधन झालं. माधवराव दहिफळे हा त्यांचा मुलगा डॉ. वर्षा त्यांची बहीण प्रभाकरराव व्यवसायाने अंबाजोगाई आणि परळी न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करत होते. शांत आणि मनमिळाऊ स्वभावाने लोकांची मनं जिंकत. भाजपाचे नेते स्व . गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे ते खास मित्र  होते .वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मुंडे साहेबांनी त्यांना संस्थापक-संचालक बनवलेलं होतं. धर्मापुरी, घाटनांदुर परिसरात मुंडे साहेब साठी ते जिवाचं रान करायचे. त्यांच्यावर साहेबांचा फार मोठा विश्वास होता .घाटमाथ्यावर त्यांना वकील साहेब म्हणून सर्वत्र ओळखा ले जात असे . अनेक वर्षापासून ते अंबाजोगाईला राहत होते. सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा त्यांना होती. मुंडे साहेबावर त्यांचे प्रेम कधीच लपून राहिले नाही. प्रसिद्धीच्या  झोतात  न येता साहेबांच्या साठी पडद्यामागे काम करणारा निष्ठावान भक्त अशी पण ओळख असायची .मात्र सात वर्षांपूर्वी हृदयविकाराने त्यांचं निधन झालं. माधवराव दहिफळे हा त्यांचा मुलगा कृषी कंपनीमध्ये अगोदर नोकरी करत होते. वडीलाच्या जाण्यानंतर नोकरी सोडून घराची जबाबदारी आईच्या मार्गदर्शनाखाली सांभाळतात. दरवर्षी वडिलांची पुण्यतिथी आपल्या गावात मोठ्या प्रमाणावर साजरी करतात. नामांकित महाराजांना आणून किर्तन   गावाला स्नेहभोजन असा उपक्रम असतो. मात्र यंदा कोरणा संकटामुळे मला हा कार्यक्रम करता येत नाही ही अस्वस्थता त्यांच्या मनात खूप?  खरंतर आज जिवंत असलेल्या आई-वडिलांना जन्मदाते वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात? त्यांचा सांभाळ करत नाहीत ,असं चित्र असताना वडिलांची सातवी पुण्यतिथी साजरी करता येईना म्हणून. मुलगा गेल्या आठ दिवसापासून मानसिक तणावात आहे. हा जो जिव्हाळा खरोखरच नव्या पिढीला आदर्श घेण्यासारखा आहे, आई वडिलांची पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळणं. आणि मरणोत्तर अशी सेवा जर मुलं करीत असतील? तर खरच अशी माणसं परमेश्वराला खूप आवडतात. म्हणूनच म्हटलं जातं. कुळी कन्या पुत्र, होती जे सात्विक. तयाचा हरी क वाटे देवा. असंच माधवराव मुलाच्या बाबतीत म्हणता येईल .आज पुण्यस्मरण आहे यानिमित्ताने वडिलांची पूजाविधी व त्यांनी स्वतःच्या घरात ठेवली आहे. कोरणा संकटाचा हा परिणाम खऱ्या अर्थाने दिसून येतो. सुख दुःख  साजरा करता येईना हा नियतीचा खेळ आहे. तरीपण कोरोना गेल्यानंतर पुढच्या वर्षी वडिलांची पुण्यतिथी जोरदार साजरी करेल. अशा प्रकारची प्रतिक्रिया दहिफळे यांनी बोलून दाखवली.

पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी दिला पूर्ण विराम !


कार्यालय तर राहिलेच आणि कार्यक्षेत्र वाढवून  दिले ; परळीचे जलवैभव वाढवले  - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

सर्वस्तरातून निर्णयाचे स्वागत


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- 
           परळीतील बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता कार्यालय लातुर येथे स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. याबाबतचे ना.धनंजय मुंडे हे कार्यालय स्थलांतरित होऊ नये यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील होते. पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी  पूर्ण विराम मिळवून दिला आहे. हे कार्यालय आता परळीत तर असणार आहेच तसेच या कार्यालयांतर्गत तीन जिल्ह्यांचा कारभार चालणार आहे.कार्यक्षेत्र वाढवून परळीचे जलवैभव वाढवले  असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

       राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे मंडळ कार्यालयास, माजलगाव कालवा विभाग क्रं ७ गंगाखेडसह एकूण ४ उपविभाग परळीस जोडून एकूण ४ विभाग आणि अतिरिक्त २९ उपविभागांचे कामकाज आता परळीतून चालणार आहे. यासाठी परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून तट प्रयत्नांना आता यश आले आहे.राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पांतर्गत मंडळाकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निम्न दुधना प्रकल्प नांदूर मध्यमेश्वर कालवा यासह विविध प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याने औरंगाबाद कार्यालयाने जायकवाडी प्रकल्पाचे मंडळ कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.परळी उपविभागांतर्गत याआधी ३ उपविभाग होते आता एक विभाग जोडला आणि त्यातील ७ उपविभाग असे ४ विभाग आणि २९ उपविभाग आता परळी मंडळास जोडण्यात आले आहेत.
         जलसंपदा विभागाअंतर्गत परळी तालुक्याचे वैभव वाढवणारा निर्णय घेतल्याबद्दल जलसंपदामंत्री जयंत पाटील , बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे तमाम परळीकर व बीड जिल्ह्यावासियांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आभार मानले आहेत.

लग्नाचे खोटे आमीष दाखवून तरुणीचे अपहरण ; परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- तालुक्यातील धारावती तांडा येथून लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका तरुणीचे अपहरण केले असल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गावातीलच आठ जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परळी तालुक्यातील धारावती तांडा येथून दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणीस लग्नाचे खोटे आमिष दाखवून गावातीलच विष्णू राठोड, यशवंत प्रेमदास पवार, शांताबाई काशिनाथ राठोड, दशरथ राजाराम राठोड, शेवंता दशरथ राठोड, राहुल दशरथ राठोड, कृष्णा दशरथ राठोड, आणि वनिता अनिल राठोड यांनी अपहरण केले. गेली पंधरा ते वीस दिवसांपासून अपहरण झालेल्या मुलीचे वडील विजयकुमार गोविंद राठोड आपल्या मुलीसाठी प्रयत्न करीत आहेत परंतु अरोपितांनी त्यांना जराही मुलीबाबत थांगपत्ता लागू दिला नाही.
      शेवटी अपहरण झालेल्या मुलीचे वडील विजयकुमार गोविंद राठोड राहणार धारावती तांडा तालुका परळी यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांना भेटून झालेल्या घटनेची माहिती दिली. पुरभे यांनी क्षणाचाही विलंब न करता झाल्या घटनेची शहानिशा करून गु. र. नंबर २४९/२०२० कलम ३६३, ३६६, ३४ नुसार वरील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नायक केकान करीत आहेत.

जिल्हा कृषी अधीक्षक व्ही. एम. मिसाळ यांची परळी तालुक्यातील विविध ठिकाणी पीक पाहणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
आज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व्ही. एम. मिसाळ  यांनी परळी तालुक्यातील विविध ठिकाणी पिकांची पाहणी केली . पिकावरील किड व रोगाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मलनाथपुर येथे गंगाधर गुळवे यांच्या शेतात कापूस पिकाची पाहणी करताना कापसा वरील पांढरी माशी आणि गुलाबी बोंड अळी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी  नियमित निरीक्षण करून योग्य औषधाची फवारणी करावी. फेरोमन ट्रॅप शेतात लावून त्याचे निरीक्षण करावे, फवारणी करताना आरोग्याची काळजी घ्यावी सुरक्षा किट चा वापर करावा यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पुढे पिंपळगाव गाढे येथे बापूराव कराड यांच्या शेतावर घरघुती सोयाबीन बियाचे बीबीएफ तंत्रावर पेरणी  पिकाचे सर्व्हेक्षण करताना उपस्थित शेतकऱ्यांना  बी बी एफ या पेरणी तंत्राचा शेतकरयांना उत्पादन वाढण्यास आणि  इतर शेती कामे सोयीस्कर होण्यासाठी खूप उपयोग असून सर्वांनी इथून पुढे याच तंत्राचा उपयोग करावा आणि उत्पादन वाढवावे. तसेच पुढील हंगामात  सोयाबीन बियाणे शेतकर्यांनी स्वतः घरच्या घरी तयार करावे यासाठी कृषी विभागाचे सहकार्य आपल्याला मिळेल असे सांगितले. शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे तयार करण्यासाठी आतापासून कामाला लागावे असे मार्गदर्शन पर सांगितले. सिरसाळा येथे कृषी सहायक शिंदे मॅडम सोबत कापूस पिकाची पाहणी करून किड व रोग यावर मार्गदर्शन केले.  यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे , पर्यवेक्षक चंद्रकांत अप्पा थोंटे , कृषी सहायक वाय एम हाडबे, मिरा टोंम्पे, लिंबकर मॅडम, आणि पोखराचे समूह सहायक हनुमंत चोले उपस्थित होते.