तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 1 August 2020

दुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने आंदोलन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आर्थिक संकटात सापडलेल्या दुध उत्पादक शेतकरी यांना दुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान या मागणीसाठी माजी ग्रामविकासमंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली परळी भाजपाच्या वतीने आज 1 आँगस्ट रोजी रस्त्यावर दुध ओतून तीव्र आंदोलन केले. तसेच आंदोलना नंतर परळी तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी बाबत निवेदन देण्यात आले. 
     याबाबत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. कोरोना लाॅक डाउनमुळे मोठी घट झाली आहे. तर सरकी पेंड व सुग्रास खाद्य यांचे वाढलेले भाव, आणि दुधाचे घसरलेले भाव लक्षात घेता झालेला खर्च ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय आज अडचणीत सापडला आहे. बिसलरी पाण्याची बॉटल 20 रुपयाला आणि दूध मात्र 17रू. या बेताल परिस्थितीमुळे दूध व्यवसाय मोडकळीस निघण्याची वेळ आली आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी,सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत विमा काढण्यात यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी परळीत भाजपच्यावतीने लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 आॅगस्ट आंदोलन करण्यात आले. यावेळी दुध रस्तावर सांडून शासनाचा निषेध करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी सकाळी 10 वाजता ईटके काॅर्नर येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
                यावेळी रासपाचे महासचिव बाळासाहेब दौडतले, तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड, ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे, रिपाई राज्य सचिव भास्करराव रोडे, ज्येष्ठ नेते उत्तमराव माने, युवा नेते निळकंट चाटे, दिलीप आबा बिडगर, भिमराव मुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश माने, सरचिटणीस रवी कांदे, पंचायत समिती सदस्य भरत सोनवणे, बीड जिल्हा बँकेचे संचालक नितीन ढाकणे, मा.सभापती प्रभाकर फड, अरुण पाठक, नितीन समशेट्टे, मा.सभापती बळीराम गडदे, युवा नेते संजय मुंडे, संतोष सोळंके, धनराज गित्ते चांदापुर, सतिश फड, पप्पू चव्हाण, सरपंच नवनाथ गित्ते, सुंदर मुंडे, तानाजी व्हावळे, फुलचंद मुंडे, धनराज गित्ते , भुराज बदने, नारायण तांबडे, भगवान राजे कदम, शहाजी चव्हाण, माऊली साबळे, योगेश पांडकर, गोविंद मोहेकर, शाम गित्ते, गोविंद चौरे, पिंटू कोपनर, गणेश होळंबे, नितीन मुंडे, चैतन्य मुंडे, बाळासाहेब शिंदे, श्रीहरी मुंडे, अमोल वाघमारे, महादेव मुंडे, भिमराव हाके, बहुसंख्येने दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. दरम्यान रासपाचे महासचिव बाळासाहेब दौडतले, तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,  ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे, रिपाई राज्य सचिव भास्करराव रोडे, ज्येष्ठ नेते उत्तमराव माने यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टिका करत निषेध व्यक्त केला. प्रास्ताविक भाजपाचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते यांनी केले आहे.

No comments:

Post a comment