तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 August 2020

वरवट बकाल येथे 51 गणेश भक्तांनी केले रक्तदान ! नवयुवक गणेशोत्सव मंडळाचे ७ वर्षा पासुन स्तृत्य उपक्रम

संग्रामपूर [ प्रतिनिधी] कोरोना रोगाच्या व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे नवयुवक गणेशोत्सव मंडळा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन आज 23 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. मंडळाचे रक्तदान शिबिराचे ७ वे वर्ष असून या वर्षी सुद्धा चागल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. देशात कोरोना रोगाने थैमान घातले असून या वर्षी गणेशोत्सव आरोग्यउत्सव म्हणून साजरा करतांना आज रक्तदान शिबीर घेण्यात आले मागील दरवर्षी हे मंडळ समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, रक्तदान आदी समाजपयोगी उपक्रम राबवितात. यावर्षी रक्तदात्या मध्ये रामदास दामधर,अशोक वानरे,नितीन बोडखे, निशिकांत डाबरे, गजानन दामधर,सागर शेंगोकार,किशोर रोंदळे,चेतन बकाल,सौरभ तायडे,कपिल गांधी,योगेश तायडे,नितीन टाकळकार,गणेश अस्वार, निलेश भोपळे ,कुणाल मेतकर, दत्ता बकाल, सह 51 गणेश भक्तांनी रक्तदान केले.रक्त संकलन चे काम अकोला येथील साईजिवन रक्तपेठी ने पाहले.

No comments:

Post a comment