तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 August 2020

पै.माधव सपाटे यांच्य वाढदिवसानिम्मित आणि युवा संघर्ष ग्रुपच्या यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 86 रक्तदात्यांचे रक्तदान..


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली (दि.25) :- आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी खरबी ता.जि. हिंगोली येथे संघर्ष युवा गृप या सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने सामाजिक सेवाभावी संस्थेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली.नामांकित पैलवान गजानन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रुपची स्थापना करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.ग्रुपचे अध्यक्ष पैलवान माधव सपाटे यांच्या वाढदिवसाचे व युवा संघर्ष ग्रुपच्या स्थापनेचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत तब्बल 86 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यानंतर प्रत्येक तीन व सहा महिन्यांनी ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे तसेच,आरोग्यविषयक शिबिरे यांचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच शेतकरी,युवक,विद्यार्थी,ग्रामीण भागातील खेळाडु यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे घेण्यात येणार असल्याचा ग्रुपचा मानस असल्याचे कळविण्यात आले, प्रस्तावना संजय पडघान नवलगव्हाणकर यांनी केली आणि लवकरच या युवा संघर्ष  ग्रुपची कार्यकारिणी गठीत करण्यात येणार असल्याचे यावेळी ग्रुपचे जगन टेकाळे व ऍड.नवनाथ पारोकर यांनी सांगितले. प्रयावेळी पै.गजानन भोयर,पै.माधव सपाटे,ऍड.नवनाथ पारोकर,जगन टेकाळे,पै.अभिजित पवार,पै.विकास वाघ,पै.राजू शिंदे तसेच सर्व युवा संघर्ष पदाधिकारी व सदस्य यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रुपच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले


तेज न्यूज हेड लाईन्स .ऑनलाईन वेब

No comments:

Post a comment