तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 August 2020

हत्ता नाईक येथे वाणी कोचिंग क्लास च्या अभिजीत गोरे यांनी 91% ची मारली बाजी


( वाणी कोचिंग क्लासचे दर वर्षाची परंपरा कायम) 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


-सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे  वाणी कोचिंग क्लासेस चा एस एस सी मार्च 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा  ट्रॉफी वितरण व सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्लासेस मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले ९१ टक्के अभिजित अशोक गोरे यांना ट्रॉफी देण्यात आली  देण्यात आले. द्वितीय  लुकमान शहा(.८४%) तृतीय  कोमल ज्ञानेश्वर गादेकर (८३.%) ट्रॉफी देण्यात आले. विशेष प्राविण्यासह व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर ट्रॉफी  व सत्कार करण्यात आले.  कार्यक्रमात अध्यक्ष संरपच हरिभाऊ गादेकर प्रमुख पाहुणे माजी उपसंरपच शेख हाकिम राजाराम मोठे राहुल ठोके ज्ञानेश्वर गादेकर ममताजी हिमगिरे अशोक गोरे छत्रपती काचगुंडे रउप शेख राजू गादेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच क्लासेसचे संचालक आश्रुबा वाणी सर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुढील काळात कोणते क्षेत्र निवडायचे या विषयी मार्गदर्शन देण्यात आले. आज कोरोना चे संकट असल्यामुळे पुढील शिक्षण हे ऑनलाईन देण्यात येत आहे परंतु ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण हे उपयुक्त होऊ शकत नाही कारण तंत्रज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोहचण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. हा कार्यक्रम कोरोनाच्या संकटामुळे सामाजिक अंतर पाळून करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अनुराधा हिंमगीरे यांनी केले तर आभार  वाणी कोचिंग क्लासचे संचालक एस वाणी सर यांनी  यांनी केले 


प्रतिक्रिया 
हत्ता नाईक येथें वाणी कोचिंग क्लास 2017 पासून ग्रामीण भागातील विध्यार्थी घडवण्यासाठी पर्यतशील आहें तरी शहरी भागातील तुलनेत वाणी कोचिंग क्लास सतत बाजी मारले ह्या क्लासमुळे मुलांना एक ध्यय दिसते आणि शिक्षणाची गोडी विध्यार्थी मधे निर्माण होत आहें मेडिकल इंजिनियर व ईतर षेत्रामधे सुध्दा मुलाने आणि मुलीने बाजी मारली आहें या वर्षात अभिजित गोरे यांनी 91% टक्के मार्क घेऊन वाणी कोचिंग क्लासचे नाव लोकीक केले आहें 

अाश्रूबा संबाजी वाणी संचालक वाणी क्लासेस 

हत्तानाईक ता .सेनगाव .जिल्हा हिंगोली 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment