तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 1 August 2020

सेलूत भाजपाचे रास्ता रोको आंदोलन


दूध दरवाढ करण्याची मागणी

सेलू, दि.१ ( प्रतिनिधी ) : करोना संकटात अडचणीत सापडलेल्या दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला सरसकट प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावे, दुध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दुध खरेदी दर ३० रुपये प्रति लिटर करावा. या मागणीसाठी भाजपाच्या वतीने शनिवारी ( १ ऑगस्ट ) सेलू ( जि.परभणी ) येथील रायगड कॉर्नरवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 
बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शशिकांत देशपांडे, अशोक खताळ, भाऊसाहेब सोनवणे, शिवाजी खेडेकर, संदीप बोकन, प्रकाश शेरे, अर्जुन बोरूळ, नागेश ठाकूर, कपिल फुलारी, जयसिंग शेळके, नीरज लोया, पंकज कुलकर्णी, पिंटू पौळ, दत्ता पवार, बाळासाहेब काजळे, किशोर कारके, गोविंद शर्मा, दीपक कोनहाळ आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

फोटो ओळी : 
सेलू ( जि.परभणी ) येथील
रायगड कॉर्नरवर दूध दरवाढीसाठी शनिवारी भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

पूर्ण...

No comments:

Post a comment