तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 August 2020

हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश जिल्हा अधिकारी यांनी नुकसान जालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काढले आदेश

.
हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ या तालुक्यातील अनेक भागात खरीपाचे मूग,  उडीद, कापूस, हळद व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, 

      या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना व तसेच सोयाबीन या पिकाची पाने पिवळी पडून पीक हातचे जात आहे, या नुकसानीचेही तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी खा.हेमंत भाऊ पाटील यांनी पत्राद्वारे  हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या  पत्राची तात्काळ दखल घेत हिंगोली जिल्हाधिकारी  यांनी  दि 22/08/2020 रोजी नुकसान जालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश काढले आहेंत महसूल विभाग,  कृषी विभाग, व वनविभाग, यांना नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले जिल्हाधीकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत

No comments:

Post a comment