तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात क्रीडा दिन संपन्न

सोनपेठ : येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ. मुकुंदराज पाटील, क्रीडा संचालक प्रा. गोविंद वाकणकर हे होते.
दरवर्षी विविध उपक्रमांनी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची 29 ऑगस्ट रोजी जयंती कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाकडून साजरी केली जाते यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रीडा समितीचे प्रा.डॉ. संतोष रणखांब, प्रा.डॉ. शिवाजी वडचकर, प्रा. डॉ. मोहन मिसाळ, प्रा. संदीप कुमार देवराये, प्रा.डाॅ. शिवाजी अंभुरे, प्रा. डॉ. बळीराम शिंदे, प्रा.सखाराम कदम, प्रा.संतोष वडकर,प्रा.महालिंग मेहत्रे, प्रा.सतीश वाघमारे, रमेश काळे, रंगनाथ चोंडे,पंजाब सुरवसे, संतुक परळकर,दत्ता सोनटक्के,चंदू पटके आदींसह खेळाडू प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment