तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 August 2020

दगडफेक करीत दहशत निर्माण केली व घरात घुसून अल्पवयीन मुलींची छेड काढली;. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) :- 

       वृद्ध आजी व आईसोबत राहणा-या अल्पवयीन मुलींना सातत्याने त्रास देणाऱ्या आरोपींनी छेडछाडीची परिसिमा  केली. मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या घरासमोर आरडाओरडा करत घरावर लाथा घालून दगडफेक करून दहशत निर्माण केली.बाहेर काय होत आहे बघण्यासाठी दार उघडले असता घरात घुसून अल्पवयीन मुलींची छेड काढली व मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी १७ वर्षिय मुलगी खंडोबानगर गल्लीत किरायाने आपल्या दोन लहान बहिणींसह आजी व आई यांच्यासमवेत राहते. घरात कोणीही पुरुष नाही , मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत हे कुटुंब राहते.गेल्या अनेक दिवसांपासून आरोपींपैकी दत्ता रामभाऊ त्रुप व प्रितम रोहीदास बनसोडे हे येता जाता तसेच मोटारसायकलवरून नेहमीच फिर्यादी मुलीची छेड काढत तीने ही बाब घरच्यांनाही सांगितली. परंतु आपल्या पाठीशी कोणी नाही या विचाराने अनेकदिवस या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. हा प्रकार दिवसेनदिवस वाढत असल्याचे पाहून या मुलीच्या आई व आजीने   या मुलांच्या घरच्यांना कानावर घातले. मात्र दि.25 ऑगस्ट रोजी मध्यरात्री आरोपी प्रितम रोहिदास बनसोडे,संतोष बाबुराव इंदरकर, दत्ता रामभाऊ त्रुप,लक्ष्मण सोपान फाकटे,रामेश्वर साहेबराव गरड, गजानन लासे हे सहा जण खंडोबा नगर येथील डांगे यांच्या वाड्या समोर येवुन फिर्यादी मुलगी,तिच्या बहिणीस अश्लील भाषेत शेरेबाजी करुन घरावर दगडफेक केली असता मुलीच्या आईने घराचे दार उघडुन बघितले तर वरील सहा जणांनी बळजबरीने घरात प्रवेश केला. आजी व आईस मारहाण करत दोन्ही मुलींशी लगट करुन छेड काढु लागले, आरडा ओरड केल्याने ते सहा जण घराबाहेर गेले व यावेळी त्यांनी अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी 17 वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरुन वरील सहा जणांविरुध्द कलम 354 (ए) (डी),336, 323,143, 149, 504,506,188,बाललैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 8,12,आपत्ती व्यवस्थापन 51(बी),कोव्हीड 19 अधिनियमनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पो.उप.नि. सी.एच.मेंढके हे करीत आहेत.

No comments:

Post a comment