तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 20 August 2020

गणेशोत्सवासाठी सहा शहरातील निर्बंध शिथिल


 बीड (प्रतिनिधी)  :- 
कोरोनाविषाणू रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे बीड अंबाजोगाई माजलगाव परळी केअर आष्टी या सहा शहरांमध्ये दिनांक 12 ऑगस्ट पासून दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे संचार बंदी आदेश लागू करण्यात आले होते मात्र गणेशोत्सवाच्या दृष्टीने शहरातील गर्दी नियंत्रित करणे आवश्यक आहे यासाठी दिनांक 9 ऑगस्ट रोजी रोजी च्या आदेशान्वये या सहा शहरांसाठी चे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे मात्र केवळ दोन फूट उंचीपर्यंत श्रीगणेशमुर्तींचे दुकान किराणा दुकान फळे-भाजीपाला दूध मेडिकल पुजेच्या साहित्याची दुकाने हार फुलांची दुकाने यांची घाऊक व किरकोळ विक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे संपूर्ण जिल्ह्यातील या दुकानांमुळे गर्दी होऊ नये यासाठी सगळी दुकाने शहरातील गावातील वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्णपणे विस्तारित असतील आणि एकाच ठिकाणी रस्त्यावर राहणार नाहीत याची जबाबदारी संबंधित नगरपालिका नगरपंचायती ग्रामपंचायत यांची राहील मात्र यामध्ये सुशोभीकरणाची साहित्य विक्री दुकाने मिठाईची दुकाने हॉटेल रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना उघडण्यास परवानगी असणार नाही याबाबत चे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येतील सर्वांनी covid-19 विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे सध्या या सहा शहरांमध्ये एजंट टेस्ट ही मोहीम सुरू असून यासाठी व्यापारी यांनी सहकार्य करावे कंटेनमेंट झोनमधील निर्बंध तसेच कायम राहतील असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी जारी केले आहेत.

No comments:

Post a comment