तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 August 2020

देऊळगाव दु. येथे जडीबुटी दिनानिमित्त औषधी वनस्पतीची लागवडताडकळस,प्रतिनिधी
 येथून जवळच असलेल्या देऊळगाव दुधाटे येथील जिजाऊ गार्डन मध्ये  पतंजली योग पीठ हरिद्वार आयुर्वेदाचार्य बालकृष्ण महाराज यांचा जन्म दिवस  दी.४ऑगस्ट रोजी "जडीबुटी दिवस" म्हणून साजरा करण्यात आला यावेळी  विविध औषधी वनस्पती ची लागवड व रोपांचे वाटप करण्यात आले.
       पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दू.येथील गोदावरी नदीच्या काठावर जिजाऊ गार्डन गावकऱ्यांच्या लोकसहभागातून सुशोभित केले जात असून याकामी तरुण ,ज्येष्ठ नागरिक,महिला मेहनत घेत आहेत या गार्डन मध्ये विविध प्रकारची झाडे लावली आहेत. यावेळी दिनांक चार ऑगस्ट रोजी आयुर्वेदाचार्य बालकृष्ण महाराज यांच्या जन्मदिवसा निम्मित गुळवेल,तुळस,कोरफड,चिंच,शेवगा, आवळा,चंदन,मिलीया दुबीया औषधी वनस्पतींची लागवड करून "जडीबुटी दिवस "साजरा केला .याकामी सीताराम पवार यांनी जवळपास दीडशे झाडे मोफत उपलब्ध करून दिली.यावेळी पतंजली समिती पूर्णा किसान प्रभारी प्रताप काळे यांनी आपल्या आसपास असलेल्या दुर्लक्षित गुळवेल औषधी वनस्पतींची लागवड करून निरोगी आरोग्यासाठी  किती महत्त्व आहे याची माहिती दिली.यावेळी संभाजीराव भोसले, भगवानराव दु धाटे,पो.पा.शिवाजीराव दुधाटे,सीताराम पवार ,संतोष आवरगंड,जनार्दन आवरगंड,उपस्थित होते .यशस्वितेसाठी प्रयोगशील शेतकरी गोविंद दुधाटे ,पंढरी शिंदे, सुदम आबा दुधाटे,आबाराव दुधाटे,यांनी परिश्रम घेतले.
कृषिभूषण कांतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव येथील स्मशानभूमी व जिजाऊ गार्डन चा विकास लोकसहभागातून होत असल्याचे पाहून आपणही गावचे देणे लागतो या भावनेतून परभणी  पोलिस  कर्मचारी शिवाजीराव दुधाटे यांनी आपल्या इतर खर्चाला फाटा देत रोख अकरा हजार रुपयाची रक्कम चळवळीचे प्रमुख गोविंदराव दुधाटे यांच्याकडे सुपूर्द करत दिवसभर श्रमदान करून परिसरातील शासकीय अधिकाऱ्यांसमोर आदर्श निर्माण केल्याने गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a comment