तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

आपले पालम व्हाट्सअप ग्रुप च्या वतीने उदया भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनसामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम


अरुणा शर्मा


पालम :- दानामुळे पुण्य मिळते; परंतु रक्तदानामुळे एखाद्याला नवजीवन प्राप्त होते किंवा त्याचा पुनर्जन्म झाल्यासारखा होतो. म्हणून गणेशोत्सवातील झगमगघाटामध्ये पैशाचा अपव्यय न करता सामूहिक रक्तदान करून अनेकांचे आयुष्य उभारू या ! असा उदात्त हेतू 'आपले पालम', या व्हाट्सअप ग्रुपने रक्तदान शिबिर ठेवून जपला आहे.
 त्याला जागत ग्रुपमधील तब्बल 101 मेंबरने दातृत्व दाखविले. म्हणूनच ग्रुपने आज रोजी पालम शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी दाखविली आहे.
 कोवीड महामारीच्या संकटात परभणी जिल्हा सामान्य रक्ताचा तुटवडा जाणवत होता. कारण मार्चपासून ते ऑगस्ट २०२० पर्यंत जिल्ह्यात कोठेही रक्तदान शिबिरे झालेली नव्हती. म्हणून रुग्णालयाने रक्तदात्यांना आवाहन केले होते. त्याला काही जणांनी प्रतिसाद दिला; पण तो अपुरा आणि अल्प होता. आजही फारसे चित्र पालटलेले नसेल, म्हणून पालम व्हाट्सअप ग्रुपने, यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी युवक एकत्र येतात, असा गणेश उत्सवाचा मुहूर्त साधला. त्यात शारीरिक अंतर पाळून रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय केला. त्याला ग्रुप मेंबरने लागलीच होकार दिला. शिवाय, पूर्वनोंदणी देखील करण्यास सुरुवात केली अन पाहता, पाहता तब्बल १०१ मेंबरने रक्तदानासाठी नोंदणी देखील केली. अद्यापही नोंदणी सुरूच असून कार्यक्रमापर्यंत .. रक्तदाते नोंदणी करतील, असा संकल्प ग्रुपने केला. त्याची तयारी जोरात सुरू आसुन हा कार्यक्रम उदया शहरातील डॉ. निलेश दळवे यांच्या जगदंब हॉस्पिटल मध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आली आहे. ते दुपारी १२ वाजता सुरू होईल. या होणाऱ्या कार्यक्रमाला  उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून ह भ प नारायण महाराज पालमकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या शिबिरात सहभागी होऊन गरजू व्यक्तीवर व रुग्णासाठी आपले रक्त कामी आणावे, असे आव्हान ग्रुपचे ॲडमिन मारोती नाईकवाडे, बाबाराव आवरगंड, विलास चव्हाण, रामप्रसाद कदम, डॉ. निलेश दळवी, डॉ. बालाजी हिप्पर, देवानंद हत्तींआबिरे, डॉ. प्रकाश कोकाटे, झेटिंग माणिकराव पाटील, साई गडम, डॉ. शेख बडेसाब, डॉ. गाडगीळ, अभय कुमार कदम, राहुल गायकवाड, राजकुमार गडम, महेश टाक, गजानन देशमुख, भगवान शिरस्कर, आनंद साखला, शिवाजी शिंदे, विनायक सूर्यवंशी, राम गावंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment