तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 August 2020

वाघ्या -मुरळी परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास टोणपे


सुभाष मुळे..
-----------------
गेवराई, दि. ३० _ पोवाडा, गोंधळी, वासूदेव, वाघ्या -मुरळी आदी लोककलेचे कलावंत कैलास शिवाजीराव टोणपे यांची महाराष्ट्र राज्य वाघ्या -मुरळी परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
       कैलास टोणपे हे आर.बी. अट्टल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कलावंत आहेत. त्यांनी महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यापीठाचा युवक महोत्सव यामधून आपल्यातील लोककलावंत घडविला. आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, राज्य शासनाचा क्रीडा विभागाचा राज्य युवा महोत्सव गाजवून अनेक पारितोषिके पटकावलेली आहेत. नवरात्रौत्सव, गणेश उत्सव असो की रेणुकादेवी मंदिरातील दैनंदिन भजन -कीर्तन, जागरण - गोंधळ कार्यक्रमात सहभाग, पोवाडा, वासूदेव, लावणी, गोंधळ, वाघ्या -मुरळी आदी लोककला प्रकारात नावलौकिक मिळवलेला आहे. शाळा -महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातील कलाकारांचा सराव, नियमित गीत -संगीत कार्यक्रम, आकाशावाणी, युट्यूबवर अनेक लोकगीतांचे कार्यक्रम सुरू असतात. आळंदी ते पंढरपूर पायीवारी सोहळयात लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन अनेकदा करीत आहेत.
या सर्व गोष्टींची दखल घेत महाराष्ट्र राज्य वाघ्या -मुरळी परिषदेचे राज्य अध्यक्ष प्रा.मार्तंड साठे यांनी जिल्हाध्यक्ष  रावसाहेब कांबळे यांच्या शिफारशीवरुन लोककलावंत कैलास टोणपे यांची परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी आ. अमरसिंह पंडित, आ. लक्ष्मण पवार, प्राचार्या डॉ. रजनी शिखरे,नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, जेष्ठ नाटककार अॅड. कमलाकर देशमुख, अॅड. सुभाष निकम, संगीत विशारद शिवाजी गायकवाड, चित्रपट अभिनेते डॉ. सुधीर निकम, ज्ञानेश्वर मोटे, शाहीर रामभाऊ मुळे, शाहीर विलासबापू सोनवणे, प्रा. राजेंद्र बरकसे, आमचे पत्रकार सुभाष मुळे आदींनी कैलास टोणपे यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment