तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 20 August 2020

प्रेरणा बदने हिचा अभिनव विद्यालयात सत्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय यांच्या वतीने  इयत्ता बारावी मध्ये कु. प्रेरणा राम बदने या विद्यार्थिनीने विज्ञान शाखे मध्ये 83.53% मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.त्याबद्दल संस्थेचे सचिव साहेबरावजी फड साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी विद्यार्थिनीने आपल्या सत्कारा बदल शाळेचे व संस्थेचे कौतुक करणाऱ्या हजारो व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल ... कु. प्रेरणा राम बदने हिने आशा शब्दात आभार मानले व या कार्यक्रमास विद्यार्थिनीचे वडील राम लहुदास बदने व परमेश्वर अंगद फड हे उपस्थित होते. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a comment