तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीसाठी इच्छुक व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन


बीड , दि. २३::--जिल्हयामध्ये प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी स्थापन करणेत येत असून त्यासाठी जिल्हयातील गोशाळा -पांजरपोळ असणा-या व प्राणीमात्रांवर प्रेम करणा-या इच्छुक व्यक्तींनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कार्यालय बीड येथे दिनांक २८ आॅगस्ट २०२० पर्यंत परिपुर्ण अर्ज सादर करण्यात यावेत. 

अर्ज छायाचित्रासह सादर करावेत. मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करणा-याकंडे पुढीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे. बीड जिल्हयातील गोशाळा अथवा पांजरपोळ संस्थापैकी एका संस्थेचे अध्यक्ष पद तरी उपरोक्त प्रमाणे पात्रता असणा-या बीड जिल्हयातील इच्छुक व्यक्तींनी आपल्या बायोडाटासह अर्ज ४ प्रतीत व्यक्तीशः सादर करावे.

 अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, सुभाष रोड बीड येथे  संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुकत, बीड यांनी केले आहे.
.०००००

No comments:

Post a comment