तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

होम क्वारंटाईन असलेला पाॕझिटिव्ह रुग्ण बाहेर आढळुन आल्यास गुन्हे दाखल होणार-तहसीलदार विपीन पाटिल


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी शहर व तालुक्यातील होम क्वारंटाईन असलेले कोरोना रुग्ण नियमाचे उल्लंघन करत घरा बाहेर पडत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने तालुका प्रशासन अश्या रुग्णावर कडक पाळत ठेऊन गुन्हे दाखल करणार असल्याचे तहसीलदार विपीन पाटिल, गटविकास अधिकारी संजय केंद्रे,मुख्याधिकारी अरविंद मुंडे,वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,पोलिस निरिक्षक हेमंत कदम,पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी कळवले आहे.

परळी शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशान्वे परळीतील आरोग्य प्रशासन व महसुल प्रशासनाने त्याचे नियोजन करुन व्यापारी कामगार व कंटेन्मेट झोन मधील नागरिकांचे स्वॕब व रॕपीड अॕन्टीजन टेस्ट मोठ्या प्रमाणात घेतल्या गेल्यामुळे केवळ शहरात तब्बल 348 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.
शासनाने दरम्यान निर्गमित केलेल्या आदेशामुळे पाॕझिटिव्ह रुग्ण जर होम क्वारंटाईन स्वताः होणार असेल तर काही अटी घालुन दिल्या आहेत.जसे कि पाॕझिटिव्ह रुग्णाला जर आपल्या घरीच होम क्वारंटाईन व्हायचे असेल त्यांच्या घरात स्वतंत्र रुम,स्वतंत्र संडास,बाथरुम व काळजी घेणारा व्यक्ती असेल व प्रतिज्ञा पञ  प्रशासनाला जर दिले तर त्या रुग्णाला होम क्वारंटाईन होता येईल असे घोषीत केले होते.याचाच गैरफायदा घेत पाॕझिटिव्ह रुग्ण घरा बाहेर पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत.तेव्हा आपण प्रतिज्ञा पञात नमुद केलेल्या सुचना पाळत नसाल किंवा घरा बाहेर आढळुन आल्यास अशा रुग्णावर प्रशासनाने कडक पाऊल उचले असुन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तालुका प्रशासनाच्या वतिने  तहसीलदार विपीन पाटिल, गटविकास अधिकारी संजय केंद्रे,मुख्याधिकारी अरविंद मुंडे,वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,पोलिस निरिक्षक हेमंत कदम,पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी जाहिर केले आहे.

होम क्वारंटाईन असेलेले पाॕझिटिव्ह रुग्ण नियमाचे उल्लंघन करुन बाहेर फिरताना, वावरताना निदर्शनास आल्यास नायब तहसीलदार बाबुराव रुपनर 7741094542,न.प.कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे 9822245856,पोलिस हेकाॕ.समाधान भाजीभाकरे 7020734765,पोलिस हेकाॕ रुपेश शिंदे 9130851888 यांना त्वरित माहिती कळवा. संबधीत प्रशासनास तक्रार व माहिती देण्या-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे ही सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a comment