तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

परळीतुन नगरसेवकाची दुचाकी गायब

परळी (प्रतिनीधी)
 परळी नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गोपाळ आंधळे हे सायंकाळी फिरण्यासाठी मालेवाडी रस्त्यावरील डोंगरावर गेले असता रस्त्याच्या बाजुला लावलेली त्यांची दुचाकी काल दि.20 रोजी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान गायब झाली असुन ती अद्याप सापडली नसल्याने याची परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 परळी-मालेवाडी रस्त्यावरील डोंगरमाथ्यावर सकाळ,संध्याकाळी फिरण्यास असंख्य नागरीक जात असतात नगरसेवक गोपाळ आंधळे हे आपल्या मित्रासह काल दि.20 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता आपली दुचाकी क्र.एम.एच.44 एच.840 ही रस्त्याशेजारील एका विटभट्टीच्या बाजुला लावुन डोंगरमाथ्यावर गेले असता सदरील दुचाकी कुणीतरी पळवुन नेली.फिरुन आल्यानंतर दुचाकी गायब असल्याचे दिसल्यानंतर शोधा शोध केली परंतु आज दि.21 रोजी ही दुचाकी सापडली नसल्याने याबाबत परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.निर्भय परळी,सुंदर परळी,विकसित परळीचे स्वप्न दाखवणार्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या परळीत आणी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाची दुचाकी दिवसाढवळ्या गायब झाल्याने पालकमंत्र्याच्या त्या सोज्वळ घोषणेबाबत परळीकर दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.

No comments:

Post a comment