तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 August 2020

संग्रामपूर शहरातील सौंदर्य करण काम निकृष्ट दर्जाचे चौकशी करुन संबंधीत कंत्राटदारवर कारवाईचीजिल्हाधिकारी कडे मांगणीसंग्रामपूर  [ प्रतिनिधी] येथील नगर पंचायत अंतर्गत सौंदर्यीकर्णाची कामे निकृष्ठ दर्जाची होत असून या कडे नगर पंचायत चे अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे  संग्रामपूर शहरातील आठवडी बाजारात सौंदर्य करण्याचे काम निकृष्ट दर्जाचे ,होत असून कासव गतीने चालू आहे तक्रारकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की संग्रामपूर नगरपंचायत अंतर्गत विशेष सहाय्य आणि योजनेतून संग्रामपूर शहरातील आठवडी बाजारात सुरू असलेले सौंदर्य करण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत  आहे 
या कामासाठी शासनाने विशेष सहाय्य योजने अंतर्गत सत्तावन्न लाख रुपये मंजूर केले असून मागील वर्षी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते .खामगाव येथील एका कंत्राटदाराला मॅनेज करून सदर काम देण्यात आले असून हे काम सध्या कासवगतीने सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने ग्राउंड ची लेव्हल न करता तसेच काम सुरू केले काँक्रिटीकरण करताना केवळ रुळीचा वापर केला व सिमेंटचे प्रमाण सुध्दा कमी प्रमाणात दिसत आहे  यावरचे पेवर ब्लॉक  सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची असून सदर पेवर ब्लॉक ठिसूळ आहेत सद्यस्थितीत सुद्धा हे पेवर ब्लॉक टीचरणे सुरू झाले  . तसेच वाळू सुद्धा निकृष्ट दर्जाची वापरले जात असून कंत्राटदाराने सदर काम वार्‍यावर सोडले आहे. कंत्राटदाराचे कामावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून सदर काम इस्टिमेट प्रमाणे झाले नसून य कामाची चौकशी जिल्हास्तरीय गुणनियंत्रण अधिकारी कडून करण्यात यावी  व संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांचे बिले काढण्यात येऊ नये तसे न झाल्यास तक्रारदार व  गावातील नागरिक लोकशाही मार्गाने  आंदोलन करतील असे तक्रारीत नमूद आहे. तक्रार अर्जावर नंदकिशोर शिरसोले व अब्दुल युसुफ शेख यांचे सह्या असून तक्रारीचे प्रति महाराष्ट्र चे नगर विकास मंत्री माननीय हसनजि मुश्रीफ, संग्रामपूर मुख्याधिकारी नगरपंचायत  यांना देण्यात आले आहे.

No comments:

Post a comment