तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

जय मल्हार गणेश मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

     सोनपेठ : येथील जय मल्हार गणेश मित्र मंडळ तरी खेळ व नैसर्गिक पर्यावरण व संवर्धन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण  करण्यात आले .या वृक्षारोपण मध्ये 28 झाडे लावण्यात आली.  
शहरातील जय मल्हार गणेश मित्र मंडळ दहीखेड यांच्यावतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते परंतु यावर्षी कोरना साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रमांना कात्री लावण्यात आली आहे, परंतु कोरोना साथ रोग नियंत्रणाच्या संपूर्ण नियमांचे पालन करत लोकउपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत यावर्षी या गणेश मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. 
    या वेळी जयमल्हार गणेशमंडलाचे अध्यक्ष मंगेश सोन्नर, उपाध्यक्ष ऋषिकेश भंडारे, सचिव नवनाथ दातार,कोषाध्यक्ष धोंडीबा वाकडे ,शुभम सोन्नार,गणेश आवड, लखन आवड ,निवृत्ती भंडारे, अतुल भंडारे, राहुल भंडारे,जयदीप गांडगे,प्रदीप गांडगे, ऋतिक भंडारे, रमेश सरवदे, लखन आवड, मधुकर आवड, सिद्धेश्वर आवड,कुलदीप गांडगे,इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते होते.  व ज्येष्ठ मार्गदर्शक नगरसेवक लक्ष्मण खरात, रामभाऊ नवले, सतीश सोन्नर, पोलिस पाटील बालाजी कुंभार,  जगन्नाथ भंडारे,किरण घरात, जीवन गिरी,रुद्रा यादव, सीताराम चिकने, अनिल भंडारे, साहेबराव भंडारे, इत्यादी मंडळी होती.
सर्व कार्यक्रमासाठी मार्गदर्शन नैसर्गिक पर्यावरण व संवर्धन विकास संघटनेचे पदाधिकारी  वृक्षप्रेमी महेश जाधव यांनी केले.

No comments:

Post a comment