तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 August 2020

कोरोना प्रादुर्भाव कमी असताना प्रशासन चुस्त,प्रादुर्भाव वाढल्यावर झाले सुस्त!


बाजारपेठा असलेल्या मोठ्या गावात जास्त लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

नगर पालिका,ग्राम पंचायत,पोलिस प्रशासन वीना मास्क फ़िरणाऱ्यावर कार्यवाही करत होते मात्र कोरोना प्रादुर्भाव वाढल्यावर स्थानिक प्रशासन विनामास्क फिरणाऱ्यांवर ,सोशल डिस्टन्स न पाळणार्यावर कार्यवाही करण्या साठी तयार नाही.

 मेहकर २८:- (जमील पठाण ) 

मेहकर तालुक्यात सध्या कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे अश्यातच काही गावे ही कोरोना हॉट स्पॉट ठरत आहेत तेव्हा जे स्थानिक प्रशासन कोरोना प्रादुर्भाव वाढण्या अगोदर मार्च ते जून दरम्यान विणामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही,सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही सह पोलीस विभागा कडून दंडेत्मक कार्यवाही सुद्धा झाली तर काही ग्राम पंचायतीने विविध प्रकारे जनजागृती केली मात्र ही जनजागृती फक्त प्रादुर्भाव वाढण्या अगोदरच नावासाठी होती का असा प्रश्न निर्माण होत आहे.
   मेहकर तालुक्यात मेहकर नगर पालिका व ९८ ग्राम पंचायत आहेत यातील मेहकर शहर मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढलेला आहे तर १७ गावात सुद्धा कोरोना रुग्ण मिळून आले एकीकडे प्रादुर्भाव वाढत असताना समूह संक्रमण सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा स्थानिक प्रशासन व महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा ज्या कोरोना प्रादुर्भाव वाढण्या आधी जनतेला कोरोना पासून दूर ठेवण्या साठी प्रयत्नरत होते ज्यात बाहेर जातांना तोंडावर मास्क आहे किव्हा नाही याची पाहणी होत होती तर सोशल डिस्टन्स पाळल्या जाते की नाही यावर लक्ष दिले जायचे मात्र १६ जून पासून मेहकर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला तेव्हा पासून मेहकर शहर १००,डोणगांव ७०,वडगाव माळी२०,जानेफळ१५,नागपूर ३, अंजनी बु५,लोणी गवळी ३०,हिवरा आश्रम ४,घाटबोरी ४,मांदणी १,उकळी १,कळमेश्वर २,सोनारगव्हान १,राजगड १,चायगाव ४,देळगाव माळी २,जामगाव १,बेलगाव २ असे तालुक्यात २७० कोरोना रुग्ण झालें व दिवसेन दिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था नगर पालिका ,ग्राम पंचायत,महसूल विभाग,पोलीस यंत्रणा सध्या फक्त बघ्याची भूमिका घेत आहे यांनी जर विणामास्क फिरणारे व सोशल डिस्टन्स न पाळणारे यावर  कार्यवाही करून वठणीवर आणले तर सध्या जी समूह संक्रमण सदृश्य स्थिती निर्माण झाली त्यावर निश्चितच काही प्रमाणात का होईना अंकुश लागू शकतो तर शाळा बंद असल्याने शिक्षक सुद्धा जनजागृतीच्या कामी येऊ शकतात शिक्षिका कडून गावात जनजागृती केल्याने शिक्षकांचे असलेले समाजातील प्रभुत्व कामी येऊ शकते व कित्येक गावे कोरोना मुक्त राहू शकतात.
-   कोरोना प्रदूर्भावाच्या सुरवातीच्या काळात कित्येक ग्राम पंचायतीने आपल्या गावात जनजागृती केली तर काहींनी सरळ दंडात्मक कार्यवाही केली व पोलीस प्रशासनाने दंडेत्मक कार्यवाही करून जनतेला वठणीवर आणले होते अशीच गरज पुन्हा आहे कारण बाजार खुललेले आहेत तेव्हा जे दुकानदार मास्कचा वापर करीत नाहीत त्यांच्यावर कार्यवाही,जे ग्राहक विना मास्क सामान खरेदी करण्या साठी जातील त्यांना सामान नाही मिळाले तर निश्चित सर्व ठिकाणी मास्क वापरल्या जाईल या साठी प्रशासनाला समन्वय साधून योग्य प्रकारे कार्यवाही करण्याची गरज आहे.

No comments:

Post a comment