तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 August 2020

रस्त्या लगत छोट्या व्यवसायिकांनी योजनेचा लाभ घ्यावा - जे.डी. शाह


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २८ _ कोविड १९ सर्वत्र पसरलेला असताना आणि परिणामी टाळेबंदी आणि लॉक डाऊनमुळे हातावर पोट भरण्यासाठी रस्त्यावर विविध प्रकारचे व्यवसाय करणारे खुपच अडचणीत सापडले आहेत, त्यांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यात येणार आहे. त्यानुसार  कर्ज स्वरूपात अर्थिक मदत  देण्यात येणार आहे .यासाठी
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी (एमएसएमई) सुक्ष्म, लघु, आणि मध्यम क्षेत्रातील तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांविषयी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दुकानदार आणि छोटे उद्योग धंदे करणाऱ्या लोकांचं आय़ुष्य बदलणार आहे. केंद्र सरकारने स्वनिधी योजना आपल्या शहरातील नगर परिषद, नगरपंचायत मार्फत सुरू केली आहे. तरी आर्थिकदृष्ट्या गरिब असलेल्या पात्र गरजवंतानी या संधीचा ऑनलाईन अर्ज www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जे. डी. शाह यांनी एका प्रसिद्ध पत्राद्वारे केले आहे.
               देण्यात आलेल्या व प्रसिद्ध केलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील विविध शहरातील रस्त्यावर व रस्त्या लगत व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ठेला, फेरीवाले, आणि छोटे दुकानदारांना सरकार कर्ज देणार आहे. या कर्जाच्या मदतीने हे व्यवसायिक आपले कामकाज परत चालू करू शकतील. या योजनेतून व्यवसायिकांना १० हजार रुपयांचे कर्ज भेटणार आहे.  या योजनेसाठी सरकारने ५ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. दरम्यान कर्ज घेण्यासाठी तारण देण्याची किंवा कोणतीच गॅरंटी देण्याची गरज लागणार नाही अशी माहिती पत्रकात जे. डी शाह यांनी दिली आहे. प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत शहरातील
रस्त्याच्या बाजूला दुकान लावणारे, ठेला लावणाऱ्या लोकांना या योजनेतून कर्ज मिळणार आहे. फळे- भाजीपाला, लॉण्ड्री, केस कर्तनालये, पान दुकानांचा यात समावेश करण्यात आला आहे. फारच सोप्या अटींवर हे कर्ज दिले जाणार आहे. यासाठी कोणतीच गांरटी देण्याची गरज नाही. या केंद्र शासन पुरस्कृत "पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा हजारो लोकांना फायदा आहे. शहरात रस्त्यावर दुकाने लावणाऱ्यांसाठी ही फार महत्त्वाची योजना असून याचा फायदा घेत दुकानदार आपला व्यवसाय परत सुरू करू शकतील. या योजनेसाठी सरकारने ५ हजार रुपयांची तरतूद केली असून यातून हजारो दुकानदारांना, ठेले लावणाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याची आशा वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ७ टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. 
           योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे, या कर्जासाठी गॅरंटीची गरज नाही, मोबाईल अॅप आणि वेब पोर्टलवरून आपण यासाठी अर्ज करु शकता. वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास व्याजावर ७ टक्क्यांचे अनुदान मिळणार आहे. यामुळे छोट्या व्यवसायिकांना खाजगी सावकाराच्या दारावर जाण्याची वेळ येणार नाही . संकटात सापडलेल्या गरिबांना मदतीला हि योजना जाहीर केल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, व बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचे जे. डी .शाह यांनी छोट्या व्यवसाय करणाऱ्या तर्फे आभार मानले आहे.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment