तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

ई पासचे निर्बंध शिथिल मात्र चेक पोस्टवर शिक्षक व पोलीस हजरच.


  (मेहकर तालुक्यात दुसऱ्या जिल्ह्याला जोडणाऱ्या ४ सरहद्दी येतात या सर्व ठिकाणी चेकपोस्ट आहेत तेव्हा ई पासचे निर्बंध शिथिल केल्यावर सुद्धा चेकपोस्टवर शिक्षक व पोलिसांच्या दिवट्या सुरूच आहेत.) 

  डोणगांव :- २४(जमील पठाण ) 

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने जिल्हाबंदी केली होती अश्यातच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना जिल्हात प्रवेश करतांना चेकपोस्टवर ई पास आहेका येणाऱ्यांची सर्व माहिती घेऊन नंतरच जिल्हात सोडणे बंधनकारक होते मात्र सध्या कोरोना दरम्यान जे निर्बंध घातली गेली होती यात शिथिलता देऊन जनजीवन पूर्वरत करण्यात येत आहे यातीलच एक निर्बंध म्हणजे जिल्हा बंदी उठवल्या गेली एस टी बस सुरू झाली मात्र तरीसुद्धा खाजगी वाहना साठी  ई पास सुरूच होती ही अट सुद्धा राज्य शासनाने शिथिल केली मात्र जिल्ह्याच्या सीमेवर असलेले चेक पोस्ट सध्याही सुरूच आहेत त्यावर जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक १२ तासाची दिवटी करीत आहेत.
    कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बाहेरून येणाऱ्यांच्या मुळे कोरोना प्रसार होऊशाकतो त्या अनुषंगाने जिल्हा बंदी झाली होती यात कोणालाही इतर जिल्हात जायचे असेल तर ई पास घेऊनच जायचे व जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस व जिल्हा परिषद शिक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली होती तेव्हा जिल्हात प्रवेश करणाऱ्या वाहनाची चौकशी करून नंतर त्या वाहनाला प्रवेश द्यायचा असा नियम होता यात शिक्षकांनी थर्मल गनाने येणाऱ्याला ताप आहे किव्हा नाही याची पाहणी करायची व वाहनातील लोकांची व वाहनाची  संपूर्ण माहिती नोंद करायची असा नियम होता मात्र एकीकडे २० आगस्ट पासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हात एस टी बस सुरू झाली तरी चेक पोस्ट मात्र कायमच आहेत अश्यातच केंद्र शासनाने २२ आगस्ट रोजी ई पासचे निर्बंध शिथिल केले तर २३ आगस्ट रोजी राज्य शासनाने सुद्धा ई पासचे निर्बंध शिथिल केले मात्र तरी सुद्धा शिक्षकांच्या दिवट्या चेक पोस्टवर सुरूच आहे त्याही बारा बारा तासाच्या तर एकीकडे एस टी बस मध्ये कोणीही या आणि प्रवास करा असे असतांनाच दुसरीकडे खाजगी वाहनांना ई पास याने शिक्षकांची कुचम्बना होत आहे राज्य सरकारनेही ई पास बंद केल्या नंतर हे चेक पोस्ट बंद होतील की नाही याची चिंता शिक्षकांना लागलेली आहे.

No comments:

Post a comment