तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 August 2020

स्व नितिन महाविद्यालयात सर्वधर्मिय वधू-वर सुचक मंडळाची स्थापना.
प्रतिनिधी
पाथरी:-येथील स्व नितिन महाविद्यालयात आक्यूएसी विभागाच्या वतीने सर्वधर्मिय वधू-वर सुचक मंडळाची स्थापना प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या हस्ते मंगळवार ०४ आॅगष्ट रोजी करण्यात आली.

या वेळी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत या कार्यक्रमा साठी या सुचक मंडळाचे सदस्य तथा आयक्यूएसी विभागाचे प्रा डॉ भारत निर्वळ,प्रा डॉ हरी काळे, प्रा डॉ सौ गायकवाड,प्रा डॉ साहेब राठोड, प्रा तुशीदास काळे,प्रा संजयसिंग ठाकूर,किरण घुंबरे यांची उपस्थिती होती. हे सर्वधर्मिय विवाह सुचक मंडळ स्थापण्या मागचा उद्देश सांगतांना प्राचार्य डाॅ राम फुन्ने म्हणाले की,सद्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जिवणात जनसंपर्क होत नसल्याने वधू-वरांना योग्य स्थळ भेटत नाही. महाविद्यालयातील कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्याने या महत्वाच्या विषयावर चांगले काम होऊ शकते हे गृहीत धरून या सर्वधर्मिय वधू-वर सुचक मंडळाची स्थापणा करण्यात आली असल्याचे सांगत लॉकडाऊन संपल्या नंतर संस्थाध्यक्ष माजी आ हरीभाऊ लहाणे यांच्या मार्गदर्शनात  सर्वधर्मिय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ फुन्ने म्हणाले.

No comments:

Post a comment