तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

जय भगवान महासंघा तर्फे बेलुरा(गुठ्ठे) येथे रक्तदान


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली : आज दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी जय भगवान महासंघ जिल्हा हिंगोली या सामाजिक संघटनेतर्फे जिल्ह्यातील बेलुरा (गुठे) येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले.
बेलुरा (गुठ्ठे)ता.जि हिंगोली येथे जय भगवान महासंघ जिल्हा हिंगोली तर्फे आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी रक्तदान विषयी जय भगवान महासंघाचे जिल्हाप्रमुख विलास भाऊ आघाव यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी मोठा सहभाग नोंदवला आणि भव्य रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित जय भगवान महासंघाचे जिल्हाप्रमुख विलासराव आघाव,सरपंच गंगाधरराव गुट्टे पाटील,ऑटो महासंघाचे जिल्हा प्रमुख भगवान बांगर जिल्हा संघटक प्रेम नागरे ,पंकज व्होडगीर,पोलीस पाटील प्रशांत गुट्टे,युवा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख वैभव गुट्टे, अनिलभाऊ गुट्टे,युवा जिल्हा सचिव वैभव आघाव,तालुका सचिव अनिल सानप व तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व तरुण मंडळ मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होते....


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment