तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

विविध विकास कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्याकडे तक्रार


बुलडाणा :- २९ ( जमील पठाण) 

डोणगाव ग्रामपंचायत सचिव यांनी लॉकडाऊनचे तसेच अशिक्षित महिला ग्रामपंचायत सदस्याचा फायदा घेत या सहा ,आठ महिन्यात विविध विकास कामात लाखो रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य कथा गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी ग्रामविकास मंत्री मुंबई, पालकमंत्री बुलढाणा सह जिल्हाधिकारी यांच्याकडे आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी लेखी तक्रार दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली तसेच चौकशी होईल पर्यंत सदर ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
कोरोना लॉकडाउनच्या काळात कोणतीही ग्रामसभा तसेच मासिक सभा न घेता आणि वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बेसुमार अनैतिक आर्थिक गाव सुधार व मूलभूत सुविधेच्या नावाखाली मनमानी कारभार करून कोट्यावधींचा शासकीय निधी खर्च केला असून त्यात जवळपास अंदाजे 35 ते 40 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यात दलित वस्त्यांचा निधी इतरत्र हलविणे ,शेत सर्वे क्रमांक 123 आर मधील गाळेधारका कडून भाडेपट्टा वसूल करून नियमबाह्य खर्च करणे ,आवश्यकता नसताना ग्रामपंचायत इमारत व कोंडवाडा दुरुस्तीच्या नावाखाली 25 ते 30 लाख रुपये खर्च करणे ,वार्ड क्रमांक एक ते सहा मध्ये खडीकरणाचे नियमबाह्य काम करून निकृष्ट खडीकरण तहसील कार्यालयाची नाम मात्र रॉयल्टी काढून कर्हाडवाडी येथील खाजगी विहीरीवरून गौण खनिजांचा वापर करून 45 ते 50 लाख रुपयांचा शासकीय निधी खर्च करण्यात आला ,वार्ड क्रमांक 1 ते 6 मध्ये धार्मिक स्थळे शाळा कथा समाज मंदिरे व महापुरुषाचे पुतळ्यासमोर पेवर ब्लॉगचे निकृष्ट काम करणे ,समृद्धी महामार्गाला लागणार्‍या गौण खनिजा साठी शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार करून परवानगी देणे ,कोरोना लॉकडाउनच्या काळात व्यापारी व वाहनचालकांना दंडात्मक कारवाई करून लाखो रुपयाची वसुली करून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य  खर्च करणे,शेत सर्वे क्र.123 मधिल अतिक्रमणाचे प्रकरण न्याय प्रविष्ठ असतांनी पक्के बांधकामाची तोंडी परवानगी देऊन सध्या बांधकाम सुरू आहे इत्यादी मुद्द्याची तक्रार करण्यात आली तसेच ग्रामसचिव डोणगाव ग्रामपंचायतला रजू झाले तेव्हा डिसेंबर 2019 मध्ये शासनाच्या 14 वित्त आयोगाच्या खात्यात एक कोटी ते दीड कोटी रुपये अखर्चित असल्याचा सुद्धा उल्लेख तक्रारीत करण्यात आला. तक्रारीवर उपसरपंच जॉईन खा बिस्मिल्ला खा, ग्रामपंचायत सदस्य सैय्यद नूर सैय्यद हबीब आतार, महिला ग्रामपंचायत सदस्या सौ. संगीता दीपक नंदेवार ,सगीरा बी. शहानुर खा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चरण विजय आखाडे ,राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष यासीन बेग, शेख सलीम शेख शेखजी ,नागोराव किसन आखरे ,शेख आयुब शेख गुलाब मुल्लाजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a comment