तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 August 2020

कोवीड -१९ स्वॅबची "फरकट" थांबवा,टेस्टींग वाढवा-मनसे


आकाश लश्करे
उस्मानाबाद


उस्मानाबाद : कोरोना विषाणुचा संसर्ग चालू झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हयाचे स्वब नमुने पहिल्यांदा पुण्याला पाठविण्यात येत होते.त्यानंतर सोलापूर,लातूर,अंबोजोगाई असा प्रवास करीत आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासण्या केल्या जात आहेत . जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेवून लोकवर्गणीतून लाखो रुपये जमा करुन उस्मानाबाद येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर,उस्मानाबाद येथे कोवीड -१९ ची प्रयोगशाळा उभा केले आहे.त्याचे उद्घाटन दि.२३/०७/२०२० रोजी मुख्यमंत्री , मा.उध्दवजी ठाकरे,यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले होते . लोकवर्गणीतून या प्रयोगशाळेसाठी १ कोटी २० लाख रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे.तरी स्वब नेण्यासाठी व आणण्यासाठी प्रशासन लाखो रुपये खर्च करीत आहे.अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे स्वब येण्यास उशिर होत असल्याने कोवीड -१९ या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे.तरी देखील प्रशासन गंभीर नसून अजब फतवे काढून लोकांच्या जिवांशी खेळले जात आहे . शासकीय रुग्णालय येथील कोवीड -१९या रुग्णांची अवस्था अतिशय गंभीर असून येथे डॉक्टर,कर्मचारी जाण्यास टाळाटाळ करीत असून रुग्णाचे हाल होत असून लवकरात लवकर उच्च स्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करुन रुग्णांची गैरसोय टाळून त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करावा.तरी लाखो रुपये लोकवर्गणीतून जमा करुन उभा केलेले टेस्टींग सेंटर पूर्ण ताकदीनिशी चालू करावे,अन्यथा जिल्हाधिकारी महोदयांनी कामचुकार डॉक्टर व कर्मचाऱ्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी प्रेसनोट काढून केले आहे..

No comments:

Post a comment