तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

नूतन विद्यालयाची अनुष्का हिवाळे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम


सेलू, दि.२९( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का सुरेश हिवाळे हिने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त उदयगिरी महाविद्यालय उदगीर आणि दलित युवक आंदोलन व बेस्बा , पुणे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन महावक्ता २०२० या वकृत्व स्पर्धेत नूतन विद्यालयाला दुहेरी यश मिळवून देत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. गुरुवार ( ता.२७) रोजी या दोन्ही राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचा निकाल जाहीर झाला.
        उदयगिरी महाविद्यालय उदगीरच्या स्पर्धेत शालेय पातळीवर ' अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक सन्वयासाठीचे योगदान ' तर दलित युवक आंदोलन व बेस्बा, पुणे आयोजित खुल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महावक्ता २०२० या वकृत्व स्पर्धेत ' कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे साहित्यातील बंड ' या विषयावर अनुष्काने आत्मविश्वासाने मांडणी करून प्रथम क्रमांक पटकावला. यु ट्युबवरील अनुष्काच्या वक्तृत्वाचा व्हिडिओ चार हजार जणांनी बघितला. तिला यु ट्युबवर ९१५ लाइक , १९२ कॉमेंट तर फेसबुकवर १६२ लाइक व ६७ कॉमेंट मिळाले. एका कार्यक्रमात रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन अनुष्काचा गौरव होणार आहे. या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया , सचिव डि.के.देशपांडे, सहसचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर , जयप्रकाश बिहाणी , प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी , प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी , उपमुख्याध्यापक अशोक वानरे , पर्यवेक्षक रामकिशन मखमले, रघुनाथ सोन्नेकर , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवारात‌ अनुष्काचे कौतुक होत आहे.

फोटो ओळी : अनुष्का हिवाळे

पूर्ण..‌.

No comments:

Post a comment