तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

वरवट बकाल सरपंचाच्या घरासमोरील मुख्य रस्ता चिखलमय दुचाकीस्वार पादचारी त्रस्त


संग्रामपूर  [प्रतिनिधी ] तालुक्यातील  मध्यभागी 8 हजार लोकसंख्येचे वरवट बकाल हे गाव या गावात विद्यालय, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, विज वितरण कार्यालय, बाजार समिती असून या गावाला परिसरातील खेडी जोडलेली असून या गावात मोठी बाजारपेठ आहे. दर शनिवारी गावात आठवडी बाजार तर बस स्थानकाजवळ गुरांचा बाजार भरतो लॉकडाऊन सुरु झाल्या पासुन गुरांचा बाजार बंद असतांना तरी हि परिसरातील नागरिकांची वर्दळ सुरू राहते. बाजार परिसरात मारोती मंदिर, जि प शाळा, मस्जिद, नागेश्वर महाराज मंदिर, नवदुर्गा मंदिर, अंगणवाडी सह ग्रामपंचायत भवन आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे वरवट बकाल येथील रस्ते चिखलमय झाले आहेत चक्क सरपंच श्रीकृष्ण दातार यांच्या घरासमोर मुख्य रसत्यावर चिखल साचल्याने दुचाकीस्वार घसरुन पडल्याने किळकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या सदर मुख्य रसत्यासह गावातील रस्ते अपघाताला आमंत्रणच आहे थोड पाणी पडले तरी मोठ्या प्रमाणात चिखल साचतो. या चिखलाचा सामना करत नागरिकांसह महिलांना व विद्यार्थ्यांना चिखल तुडवत  तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायत ने जातीने लक्ष घालून चिखलमय रस्त्यावर रुळी टाकून रहदारीस योग्य करुन नागरिकांना होणार त्रास दूर करावा अशी मागणी नागरिक कडून होत आहेत.

No comments:

Post a comment