तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय


 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज २२ ऑगस्ट रोजी असलेला वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यावर्षी कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती गंभीर असून परळी शहर देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिणामांना सामोरे जात आहे.त्यामुळे सर्वांची सुरक्षा जास्त महत्वाची आहे. सर्वांच्या शुभेच्छा – आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी कोरोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असून, त्यासाठी आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद माझ्या सोबत आहेतच. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोनाला बीड जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात,आपण ही कशाही प्रकारे माझा वाढदिवस साजरा करू नये त्याऐवजी माजी ग्रामविकासमंत्री सौ.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना परिस्थितीची झळ सोसत असलेल्या समाजबांधवांसाठी काहीतरी करावे हीच अपेक्षा याच माझ्यासाठी यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील असेही अशोक जैन यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment