तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश

परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे मंडळ कार्यालयास, माजलगाव कालवा विभाग क्रं ७ गंगाखेडसह एकूण ४ उपविभाग परळीस जोडून एकूण ४ विभाग आणि अतिरिक्त २९ उपविभागांचे कामकाज आता परळीतून चालणार आहे. यासाठी परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून त्या प्रयत्नांना आता यश आले आहे.

राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पांतर्गत मंडळाकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निम्न दुधना प्रकल्प नांदूर मध्यमेश्वर कालवा यासह विविध प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याने औरंगाबाद कार्यालयाने जायकवाडी प्रकल्पाचे मंडळ कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

परळी उपविभागांतर्गत याआधी ३ उपविभाग होते आता एक विभाग जोडला आणि त्यातील ७ उपविभाग असे ४ विभाग आणि २९ उपविभाग आता परळी मंडळास जोडण्यात आले आहेत.

या अंतर्गत जायकवाडी मंडळाचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करून लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर या नावाने नवीन मंडळ कार्यालय अस्तित्वात येणार आहे. याअंतर्गत मंडळ कार्यालयाच्या विभाजनानंतर बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ याअंतर्गत पूर्वीचे ३ व गंगाखेड येथील नवीन १ असे ४ विभाग व २९ अतिरिक्त उपविभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड अंतर्गत ४ विभाग तसेच २९ उपविभाग कार्यालय आता परळी येथून कार्यान्वित करण्याचे आदेश या शासन निर्णयाअंतर्गत देण्यात आले आहेत.

पूर्वाश्रमीच्या भाजप सरकारने परळी येथील सिंचन भवन विभागीय कार्यालय पळवून लातूरला नेण्याचा घाट घातला होता, परंतु धनंजय मुंडे यांनी यास त्यावेळी विरोध करत आपली भूमिका मांडली होती.  जलसंपदा विभागाअंतर्गत परळी तालुक्याचे वैभव वाढवणारा निर्णय घेतल्याबद्दल जलसंपदामंत्री श्री.  जयंत पाटील यांचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.

No comments:

Post a comment