तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 20 August 2020

सेनगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी कोरोना बाधित सेनगाव पोलिस स्टेशन बंद पोलिस स्टेशन चा चार्ज आत्ता नरसी नामदेव पोलिस स्टेशनलाहिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलिस स्टेशनलचा अधिकारी कोरोना बाधित असल्याने आढळून आल्यानंतर आज दि 20/08/2020 रोजी पोलिस स्टेशनला निर्जतुकीकरणं करण्यात आले व सेनगाव येथील पोलिस स्टेशन बंद करण्यात आले आहें सेनगाव पोलिस ठाण्याच्या कारभार आत्ता नरसी नामदेव येथून पहिला जाणार आहें सेनगाव पोलिस ठाण्यातील एक अधिकारी कोरोना पोजिटिव्ह आला आहें याबाबतची माहिती मिळाल्या बाबत हि सर्व माहिती पोलिस निरीक्षक सरदारशिंग ठाकूर यांनी पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांना कळविले आहें आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वीलगीकरनात ठेवण्यासाठी हालचाली सुरू जाल्या आहेत आणि पोलिस स्टेशनचे कामकाज बंद करण्यात आले आहें त्यानंतर आत्ता सेनगाव पोलिस ठाण्याच्या कारभार नरसी नामदेव पोलिस ठाण्यातून पहिला जाणार आहें सेनगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 64 गावच्या गावकऱ्यांना तक्रार व पोलिस ठाण्याच्या कामासाठी नरसी नामदेव येथें जावे लागणार आहें पुढील किमान पाच ते सहा दिवस सेनगाव पोलिस स्टेशन कामकाज बंद राहण्याची शक्यता आहें अशी माहिती सेनगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सरदारशिंग ठाकूर यांनी दिली आहें 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment