तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 August 2020

शैक्षणीक प्रवेश कामासाठी अनुसुचित जमातीचे भिल, तडवीभिल, जातीचे दाखले विना विलंब द्या अखिल भारतीय आदिवासी वि परिषदची मांगणी

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुका आदिवासी म्हणुन ओळखला जातो सातपुड्याच्या कुशित वसलेल्या चिचारी , वसाडी, आलेवाडी, सायखेड, मांगेरी, चुनखेडी, सालवण, आदी गावे आदीवासी बहुल असुन या गावात  भिल , तडवी भिल, कोरकु, आदी आदीवासी समाज वास्तव्यास असुन शाळा , महाविद्यालय, आश्रमशाळा, वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृतीसाठी जातीचा दाखला अनिवार्य असल्याने कोतवाल बुक नक्कल मध्ये त्रुटी काढून अडवणुक केली जात असल्याने जातीचे दाखले मिळण्यास विलंब होत कोतवाल बुक नक्कल गाहय धरुन भिल, तडवी भिल आदिवासीना अनुसुचित जमातीचे जातीचे दाखले दिले तेव्हा भिल, तडवी भिल समाजाला जातीचे दाखले विना विलंब द्या अशी मांगणी एका निवेदन व्दारे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे निवेदनात नमुद आहे कि  मोल मजुर करुन आपल्या कुटुंबाचे पालन पाल्याचे शिक्षण करतात  आदिवासी समाजातील शिक्षित युवक समाजात जनजागृती करित असल्याने शिक्षणाचे महत्व पटवुन देत असल्याने अनुसुचित जमातीचे भिल भिल तडवीचे पाल्य शिक्षण घेत आहेत शाळा , महाविद्यालय , आश्रमशाळा , वस्तिगृह प्रवेश प्रक्रिया १ सप्टेंबर पासुन सुरु होत असल्याने लॉकडाऊन काळात आदिवासी विद्यार्थ्यानी जातीचे दाखले काढले नाहीत तर काही आदिवासी विद्यार्थ्याचे जातीचे दाखले प्रलंबीत आहेत कोतवाल बुक नक्कल मध्ये त्रुटी काढल्या जात आहेत त्यामुळे अनुसुचित जमातीच्या जातीचे दाखले त्रुटी अभावी दाखले मिळण्यास विलंब होत आहे शाळा, महाविद्यालय, प्रवेश प्रक्रिया शिष्यवृती पासुन वंचीत राहू नये म्हणुन भिल, तडवी भिल आदिवासी विद्यार्थ्याना जातीचे दाखले विना विलंब देण्यात यावे अशी मांगणी तहसिलदार मार्फत उपविभागीय अधिकारी यांच्या कडे एका निवेदना व्दारे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ युवा सचिव महेबुब केदार ,सचीन  पालकर , हारीस सुरत्ने सुफियान सुरत्ने, यांनी केली आहे

No comments:

Post a comment