तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 August 2020

शिंदेफळ येथील एक युवक फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा पर्यंत पत्रकार आणि पोलिसांनी वाचवले त्याचे प्राण


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


हिंगोली- सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे एक युवक फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, पत्रकार मनीष खरात यांनी फेसबुक उघडले तर हा प्रकार दिसला. त्यानी त्या युवकासोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तो म्हणत होता, आता सर्व काही संपले जे काही आहे ते आता फेसबुक लाहीव मध्येच बघा. त्यामुळे खरात यांनी ही बाब स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनी शिवसांब घेवारे यांना कळविताच, त्यानी तात्काळ सूत्रे हलवत त्या भागातील  पोलीस पथक अन नागरिकांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांच्या सतर्कते मुळे युवकाचे प्राण वाचल्याने, पोलीस खरोखरच जनतेसाठी 24 घंटे सतर्क असल्याचे दिसून आले. 


संतोष वाठोरे अस त्या युवकाच नाव आहे. संतोष मागील दोन-तीन दिवसापासून मानसिकता नावाखाली होता त्याने आज सकाळी फेसबुक वर सॉरी मित्रांनो आता सर्व काही संपलं असा मेसेज टाकला आणि फेसबुक लाईव्ह मध्ये तो रडताना दिसला दरम्यान त्याचा मित्र असलेल्या मनीष खरात यांनी फेसबुक लिंक वरून सदरील मित्राला बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काही नाही हो सर एवढे म्हणत आता सर्व काही जे आहे ते फेसबुक लाईव्ह मध्ये थोड्यावेळात बघा असं म्हटल्यानंतर मनिष खरात यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनी शिवसांब घेवारे यांच्याशी संपर्क साधून, सदरील लिंक घेवारे यांच्या वाटसप वर शेअर करत नंबर ही दिला. घेवारे यांनी क्षणाचा ही विलंब न करता, युवकांचे लोकेशन ट्रेस केले.  तसेच अजून काही मित्राला फोन करून, त्याचा शोध घेयाला सांगितले. तोच घेवारे हे घटनास्थळाकडे रवाना झाले. तो पर्यंत पोलिसांचे गतिमान पथक हे घटनास्थळी पोहोचले. घेवारे यांनी अवघ्या 15 मिनिटात हे ऑपरेशन यशस्वी केले. घेवारे यांनी काही मित्राला आत्महत्या करणाऱ्या युवका जवळ पाठवुन  त्या युवकाला आत्महत्यपासून परावृत्त केले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे हिंगोली पोलीस प्रशासन पुन्हा नावारूपाला आले आहे. तर युवकाच्या नातेवाईकांनी मनीष खरात सह पोलिस प्रशासनाचे आभार मानले.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment