तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

" श्रीकांत धुमाळ यांचा एक हात मदतीचा "


(पुणे प्रतिनिधी)
श्रीकांत धुमाळ गुरूजी (ओम नम:शिवाय ज्योतिषी) यांनी कोविड १९ ,कोरोना महमारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या संकटाच्या कठीण काळात  देशासाठी, समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पुणे शहरातील नागरिकांच्या, असंख्य गोरंगरीब गरजू मजूर आणि अपंग नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सदैव अहोरात्र केलेल्या सामाजिक  कार्याची , तसेच अन्नधान्य मास्क सॅनिटायझर मदत वाटप याची दखल घेऊन श्रीकांत धुमाळ यांचा *मिडिया वर्ल्ड न्यूज आणि आणि 'लामा फेरा इंटरनॅशनल'* तर्फे ई-सन्मान पत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. श्रीकांत धुमाळ यांनी पारधी समाजातील वीस गरजु कुटुंबांना अन्नधान्य मास्क सॅनिटायझर मदत वाटप केले .या वेळी  अखिल वारी संघाचे अध्यक्ष फाळे महाराज, उपाध्यक्ष सतीश महाराज ,मच्छिंद्र महाराज कुंभार, सौ.वेल्हेकर महाराज, विजयराव अंग्रे, सुरेखा तुकाराम भोसले, सुनिल ज्ञानदेव भोसले, आणि कुणाल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a comment