तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

मुदत संपलेल्या सात ग्रामपंचायतवर प्रशासकाची नियुक्ती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
           तालुक्यातील सरपंच व सदस्यांची मुदत  संपलेल्या सात ग्रामपंचायतवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून शनिवारी (ता.२२) पासून प्रशासक ग्रामपंचायतचा कारभार पाहणार आहेत.
                        राज्यात ग्रामपंचायतची दर पाच वर्षाला निवडणूका होतात. यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता अनेक निवडणूका रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या असून तालुक्यातील सात ग्रामपंचायत रेवली, भोपळा, लाडझरी, मोहा, वंजारवाडी, गर्देवाडी, सरफराजपूर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सुरुवातीला सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लागणार होती. मात्र न्यायालयाने यास पायबंद घालून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. यामुळे राज्य सरकारने या नियुक्त्या शुक्रवारी (ता.२१) घोषित केल्या. तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतवर एस.व्ही.जाधव, भोपळा बी.बी.लांडगे, लाडझरी वाय.एस.केशोड, मोहा एल.व्ही वाभळे, वंजारवाडी अविनाश लव्हरीकर, गर्देवाडी डी.आर. गुळभिले, सरफराजपूर एस.व्ही.पालेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे सरकारी अधिकारी ग्रामपंचायतीचा कारभार हाकणार आहेत.

No comments:

Post a comment