तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 1 August 2020

उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या 'जन्मेजय' ने मिळवले ९५.८० टक्के गुण


🖋 सुभाष मुळे 
   /═══///═══╯
गेवराई, दि. १ शैक्षणिक पटलावर नेहमीच  उल्लेखनीय कामगिरीत राहिलेल्या जिनिअस क्लासेस ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत अतुलनीय यश संपादित केले आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ( शनिचे ) येथील प्रविणकुमार काळम पाटील हे शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर आहेत. अर्थातच शिक्षणाधिकारी असून यांच्या जन्मेजय या मुलाने ९५.८० टक्के गुण घेऊन यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
        गेवराई येथील जिनिअस क्लासेसने सतत अकरा वर्ष १०० % निकालाची परंपरा कायम राखली आहे. क्लासेसचे संस्थापक संचालक श्री. सुनिल रामकिसनराव चाळक सर , कार्यकारी संचालक श्री. नारायण चाळक सर, श्री. गणेश सारूक सर, श्रीमती प्राची बोर्डे, राज गायकवाड सर, आरती अवचर आणि कांचन काळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. क्लासेसचा १०० % निकाल लागला असून, इंग्रजी माध्यमाचा जन्मेजय प्रविणकुमार काळम पाटील याने ९५.८० टक्के गुण घेत क्लासेस मधून प्रथम व आरती सिधुप्पा परळकर ९५.२० टक्के घेऊन व्दितीय व विद्या रखमाजी चौधरी ९४.५० टक्के घेऊन तृतीय येण्याचा मान यांनी मिळवला आहे. क्लासेसच्या ६७ मुलांनी परीक्षा दिली होती. पैकी २६ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेतले , तर ३७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के ते ८९ टक्के च्या  दरम्यान गुण मिळवून उत्तीर्ण झाले. गणित विषयामध्ये ९० पेक्षा जास्त, विज्ञान विषयामध्ये ८५ पेक्षा जास्त, व इंग्रजी विषयामध्ये ८० पेक्षा जास्त गुण संपादित करणारे तब्बल ४३ विद्यार्थी असून क्लासेस मधे शिकवल्या जाणाऱ्या इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल आमचे पत्रकार सुभाष मुळे तसेच पालकांसह सर्वच स्तरातून क्लासेसच्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment