तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील जनावरावर लम्पी स्किन डिसेसचा प्रादुर्भाव


गडचिरोली बिड जिल्ह्यानंतर सेनगाव  तालुक्यात पसरतोय हा रोग

सेनगाव तालुक्यातील   घोरदरी येथे आढळले बाधीत जनावरे पशुपालकात भिती

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

कोरोना महामारीने त्रस्त आसलेल्या हिगोली जिल्ह्यात माणसापाठोपाठ आता एका व्हायरसने सेनगाव  तालुक्यातील जनावराव हल्ला चढवला असुन गडचिरोली बीड नंतर थेट हिंगोली  जिल्ह्यातील सेनगाव  तालुक्यातील घोरदरी येथे येऊन ठेपल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सेनगाव परिसरातील घोरदरी  गावातील जनावराना लम्पी स्किन डिसेस या रोगाची लागन होताना दिसुन येत असुन हा रोग जनावरामध्ये ढास आणी गोचीडा मार्फत पसरला जातो हा पसरायला लागला की आटोक्यात आणने अवघड आहे सेनगाव तालुक्यात घोरदरी  आत्ता या रोगाची सुरवात जाली आहें त्यामुळे या रोगाला वेळीच आटोक्यात आणने गरजेचे बनले आहे .
लम्पी स्किन डिसेस हा जनावरातील दिसुन येणारा चर्मरोग आहे यांचे जंतु देवी विषाणु गटातील कँपे पाँक्स गटात मोडतात या विषाणुमुळे शेळी , मेढ्यातील देवी रोगाच्या विषाणुशी समानता आढळुन येते मात्र हा रोग शेळी मेढ्यात अजिबात होत नाही रोगाचा प्रादुर्भाव गोवंशात ३० टक्के , म्हशीमध्ये काही प्रमाणात होताना दिसुन येतो देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरात तो अधिकतेने प्रसारीत होतो हा रोग झाल्यानंतर जनावरे अशक्त होतात ,दुध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते जनावराचा गर्भपात होतो प्रजनन क्षमता घटते  तसेच या रोगामुळे त्वचा खराब होते जनावर विकरीक दिसतात हा लम्पी स्किन डिसेस रोग आता सेनगाव तालुक्यात येऊन ठेपला आहे महाराष्ट्रातील गडचिरोली , बीड नंतर तो थेट सेनगाव  तालुक्यात दिसुन आला आहे या रोगाने घोरदरी  येथे दोन बैल  बाधीत केले आहेत त्यामुळे पशुपालकांत आता भितीचे वातावरण पसरले आहे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या गंभीर बाबीकडे अध्याप लक्ष दिले नसल्याचे दिसुन येते हा रोग ढास आणी गोडीचा मार्फत मोठ्या प्रमाणात पसरण्याची भिती आसल्यामुळे जनतेत भर कोरोनात भिती निर्माण झाली आहे हा रोग माणसाला होऊ शकतो का ..?  यांची दहशत जनतेत आहे याची गंभीर दखल आता जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने घेऊन सरसकट लसिकरण मोहीम हाती घेण्याची मागणी पशु पालकांनी केली आहे


पशु वैद्यकीय अधिकारी श्री जावळे सर यांच्याशी शरद नागुलकर यांनी संपर्क साधला असता ते ज्या गुरांना लम्पी डिसेसचा प्रादुर्भाव जाला आहें त्याना बाजूला ठेवा आणि मी सोमवारी तुमच्या गावात येऊंल असे उत्तम जावळे यांनी फ़ोन द्वारे शरद नागुलकर यांना देण्यात आले आहें सध्या नागुलकर यांनी खाजगि डॉक्टर कडून उपचार केले आहेत 

प्रतिक्रिया 

साखरा येथे पशु वैधकीय दवाखाना असुन येथे एक पशुवैधकीय अधिकारी व एक परिचर आहे हे दोन्हीनी कर्मचारी बाहेर गावावरुन अपडाऊन करत आहेत पशुपालकांनी  जनावराना दाखवायचे असेल तर या अधिका-याची तास् न तास वाट पहावी लागते तसेच कधी या  अधिका-याचे फोन बंद येत आसल्याने खाजगी डाँक्टर मार्फत उपचार करण्याची वेळ या परिसरातील पशुपालकांवर आली आहे त्यामुळे पशुवैधकीय अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनी साखरा  येथे कधीच वेळेवर हजर राहत नाहीत माज्या दोन बैलाला लम्पी स्किन डिसेसची लागन जाली आहें हा रोग संसर्गजन्य आहें त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण जाले आहें माज्या बैलाची तब्येत खुप सिरियस असून देखिल अद्याप देखिल कोणतेही पशु वैद्यकीय अधिकारी माज्या बैलाला पहायला आले नाहीत मी हिंगोली मतदारसंघातील खासदार साहेबांच्या P A ला तक्रार केली  मात्र तरीही मला खाजगी डॉक्टर कडून उपचार करावे लागले आहेत 

पांडुरंग नागुलकर रा .घोरदरी .ता सेनगाव .जि .हिंगोली 
तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment