तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

कोरोनाचे संकट दूर होऊन राज्यातील बळिराजा सुखी व्हावा हीच गणरायाकडे प्रार्थना - माजी मंत्री बबनराव लोणीकर

आमदार बबनराव लोणीकरांच्या घरी श्री ची प्राण प्रतिस्थापना

आमदार बबनराव लोणीकर यांनी केली श्री ची प्राण प्रतिष्ठापना ;कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने नियमाचे पालन करून पार पाडण्याचे केले आवाहन

परतूर


प्रतिनिधी

 - माजी  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर   यानी जालना येथील भक्तिनवास या त्यांच्या   निवासस्थानी गणरायाची प्राण प्रतिस्थापना केली आहे. आपल्या कुटुंबीयासह त्यांनी गणपती बाप्पांची पूजा करुन आरती केली.  विघ्नहर्त्याने देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन देशात सुखसमृद्धी आणि शांतता अक्षय प्रस्थापित व्हावी, अशी प्रार्थना करीत राज्यासमोरील तसेच सततच्या संततधार पाऊसाने शेतकऱ्यासमोरील सर्व विघ्ने दूर करावीत,  बळिराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना गणरायास केली. यावेळी बोलतांना लोणीकर म्हणाले कि भारतीय संस्कृतीमध्ये गणेश उत्सवाला महाराष्ट्रासह देशात मोठी परंपरा असून हि परंपरा अखंड चालू आहे.‘‘लोकमान्य टिळकांनी जात, धर्म, भाषा, पंथ यापलीकडे जाऊन लोकांनी संघटित व्हावे या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. सामाजिक अभिसरणासाठी त्यांनी सुरू केलेले पर्व अव्याहत आहे. या उत्सवातून समाज अधिक एकसंघ होऊ दे,’’ अशी प्रार्थना करून  या पावन क्षणी गणरायास प्रार्थना केली कि,राज्यातील कोरोना महामारीचे जे भीषण संकट आले आहे ते दूर करून सर्वांना निरोगी, आनंदी आयुष्य लाभू दे.तसेच  राज्यात सध्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून यातून शेतकऱ्याची लवकर मुक्तता  होऊन जनसामान्यांचे जीवन सुख-समृद्ध होऊ दे! अशी प्रार्थना केल्याचे सांगितले तसेच गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. 

कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने नियमाचे पालन करून पार पाडण्याचे केले आवाहन

देशासह संपूर्ण जगभरात ‘या वर्षी कोरोनामहामारीचे संकट आले असून या  संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन जिल्ह्यातील गणेश मंडळांना यावेळी केले  जिल्हयात २२ ऑगस्ट सप्टेंबर २०२० ते १ सप्टेंबर २०२० या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव दरम्यान नागरीकांना विविध सोयी सुविधा व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हयातील पोलीस प्रशासन व शांतता समितीचे पदाधिकारी तसेच विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी समन्वय साधुन येणारा गणेशोत्सव शांततेत व सौदार्यपुर्ण वातावरणात पार पाडावा असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव दरम्यान कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही , यासाठी जिल्हा पोलीस विभागातर्फे योग्य ती काळजी घेण्यात यावी असेही  लोणीकर यावेळी माहिती देताना म्हणाले

No comments:

Post a comment