तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 August 2020

मनपाच्या नियमांचे पालन करून कृत्रिम तलाव अथवा घरीच श्री गणरायाचे विसर्जन करावे.


(डोंबिवली प्रतिनिधी)
- आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे गणेशभक्तांना आवाहन.

कोरोना पार्श्वभूमीवर आपण मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करीत गणेशभक्तांनी सावॅजनिक गणेश मंडळे तसेच घराघरात श्री गणरायाची स्थापना केली. आज दिड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या नियमांचे पालन करीत गणेशभक्तांनी गणरायाचे विसजॅन करावे, असे आवाहन आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जनतेला केले होते. त्याला गणेशभक्तांनी तसेच मंडळानी चांगलाच प्रतिसाद दिला. विसजॅनस्थळावर भाविकांची गदिॅ टाळण्यासाठी यंदा गणेशभक्तांसाठी वाडॅ निहाय कृत्रिम विसर्जन तलाव मुंबई महानगरपालिकेने उभारले आहेत.एवढेच नव्हे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो घरातच गणरायाचे विसर्जन करावे, असे आवाहन ही मनपाने केले आहे. तर ज्यांना शक्य नाही अशांसाठी शामनगर येथील लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव येथे मनपाच्या नियमांचे पालन करीत विसर्जन करावे, असे आवाहन वायकर यांनी गणेशभक्तांना केले आहे. आज सकाळी रविंद्र वायकर यांनी शामनगर तलाव येथील विसर्जनाच्या स्थळाची पहाणी ही केली. यावेळी विश्वनाथ सावंत, नगरसेवक बाळा नर तसेच नंदू ताम्हणकर, मनपाच्या विविध विभागांचे अधिकारी तसेच पेलिस अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment