तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 August 2020

हद्दपारीचे आदेश डावलून फिरणारा तरुण गजाआड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- बीडसह पाच जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केलेला गुन्हेगारी प्रवृत्तीचा तरुण बिनबोभाटपणे परळी शहरात फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. शहर पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्या आरोपीला बेड्या ठोकल्या. नादरखान समद खान पठाण (रा. भोईगल्ली, परळी) असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याचे गुन्हेगारी कृत्ये लक्षात घेऊन त्याला गतवर्षी एप्रिल महिन्यापासून दोन वर्षांसाठी बीड, परभणी, लातुर, जालना आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. असे असतानाही तो परळीतील भोई गल्ली परिसरात उघडपणे फिरत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी छापा मारून नादरखान यास जेरबंद केले. ही कारवाई पोलीस निरिक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रदिप एकशिंगे, पोना. बाबासाहेब बांगर, महादेव तोटेवाड, केंद्रे, महिला पोलीस डोरले यांनी पार पाडली.

No comments:

Post a comment