तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

परळी भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन व वैद्यनाथास आरती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरासह महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने वैद्यनाथाच्या पायर्‍यावर घंटानाद आंदोलन करुन आरती करण्यात आली.
महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे तात्काळ सुरु करावी या मागणीसाठी भाजपाच्यावतीने राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. परळी भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथाच्या उत्तरघाटावरील पायर्‍यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी दार घड उध्दवा ! दार उघड, मंदिरा चालू, मंदिर बंद उध्दवा तुझा कारभाच धुंद अशा घोषणा देण्यात आल्या. सकाळी 11 वाजता करण्यात आलेले हे आंदोलन वैद्यनाथाच्या आरतीने समाप्त झाले. यावेळी ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, डॉ. शालिनीताई कराड, प्रा.अरूण आर्धापुरे, निळकंट चाटे,उत्तम माने,राजेश गित्ते, सौ.सारिका कुरील, राजेंद्र ओझा, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, रवि कांदे , सुरेश माने,नरसिंग सिरसाट, किशोर केंद्रे, नरेश पिंपळे, उमेश खाडे, चंद्रकांत देवकते,भरत सोनवणे, नितीन समशेट्टी, अश्विन मोगरकर, योगेश पांडकर, गोपी कांगणे, राम गित्ते, गोविंद मोहेकर,  बंडू कोरे, विजय दहिवाळ, शाम गडेकर, अभिजीत गुट्टे, संजय मुंडे, नितीन ढाकणे, भुराज बदने, किशोर गीते,सुशिल हरंगुळे, राजेंद्र दरगुंडे, विजय खसे, नितीन मुंडे, धनराज कुरील, गोविंद मोहेकर,किरण दौड हे उपस्थित होते. आंदोलनानंतर भाजपा पदाधिकार्‍यांनी आपल्या मागण्यांचे तहसिलदार यांना निवेदन दिले.

No comments:

Post a comment