तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

केंद्र सरकारच्या अध्यादेशांचे शेतकरी संघटनेने केले स्वागत .

सोनपेठ दि.२४(प्रतिनिधी) केंद्र सरकारने शेती संबधाने काढलेल्या तीन अध्यादेशांचे शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले व हे अध्यादेश कायद्यात रुपांतरीत करण्याची मागणी करण्यात आली.
देशातील शेतकऱ्यांना मुक्त बाजाराचे स्वातंत्र्य मिळावे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, या साठी शेतकरी संघटना चाळीस डंकेल प्रस्ताव व खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरणाच्या धोरणाचे समर्थन करते.यामुळे ते शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य असावे शेतकऱ्यांना आपला माल कोणत्याही बाजारात विकता यावा, ही मागणी केंद्र सरकारने एक बाजार एक देश ही घोषणा करत शेतमालाचा बाजार सामान्य नागरीकांसाठी एका अध्यादेशा द्वारे खुला केला आहे. तसेच दुसऱ्या एका अध्यादेशामुळे शेतीमाल आवश्यक वस्तु कायद्याच्या बाहेर काढले आहे, सरकार आता शेतीमालाच्या किमंती नियंत्रीत ठेऊ शकणार नाही, तसेच करार शेतीच्या अध्यादेशामुळे शेतीत कंपन्यांची गुंतवणूक वाढणार आहे . 
हे तीन ही अध्यादेश शेती व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असल्याचे शेतकरी संघटनेचे मत आहे, त्या मुळे केंद्र सरकारच्या या अध्यादेशाचे शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
 या संबधाने शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांना शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष सोमनाथ नागुरे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले.

No comments:

Post a comment